कस बोलू?

यार आज राहावतच नाही आहे. आज सकाळी किती वेळ त्या कॅन्टीनमध्ये टाईमपास केला. पण अप्सराचा पत्ताच नाही. तसे माझीच चुकी म्हटली पाहिजे. मी अजून थोडा वेळ थांबायला हवं होत. कंपनीत आली, तर तिच्या सोबत तो तिचा मित्र आणि मैत्रीण. कस बोलू? ते गेले की, तिच्याशी बोलायला जाव म्हटलं तर ती जागेवर नसणार. असाच चालू आहे कालपासून. कालही असेच. ती माझ्या डेस्कच्या बाजूने जाते पण बघत नाही. काल किती वेळा गेली माझ्या डेस्कच्या बाजूने. पण एकदाही माझ्याकडे पहिले नाही. कधी कधी वाटत तिला माझ्यात रसच नाही आहे.

पण मग माझ्या डेस्कच्या बाजूने का जाते?आणि मी बोलायचे ठरवले की, तिच्या डेस्कवर कोणी ना कोणी टपकलेलेच असते. पण मी आज काहीही करून तिच्याशी बोलणारच आहे. आता गुदमरल्याप्रमाणे होत आहे. त्या परवाच्या कॅन्टीन मध्ये ‘हाय’ न केल्याचा तिला राग आहे का माझ्यामुळे तिला त्रास होतो आहे? काहीच सुचत नाही आहे. काल पुन्हा ‘अप्सरा’ कृपेमुळे मार खाता खाता वाचलो. कंपनीतून घरी निघतांना असाच विचार करीत जात होतो. गेटवर स्वाप करावे म्हणून स्वाप केले आणि मागे वळणार तेवढ्यात एक मुलगी मागून आलेली, माझ्या पाठीच्या बाजूने असल्याने लक्षातच आले नाही. बसला धक्का तिला माझा. उपकार म्हणायचे तिचे, श्रीमुखात दिली नाही.

तसे सकाळी अप्सराही कुठल्या विचारात मग्न होती कुणास ठाऊक! माझ्या मित्राला धडकली. योगायोग म्हणायचा, दोन दिवसापूर्वी आमच्या दोघांच्या ड्रेसचा रंग एकाच होता तसा. मुळात ती मला दोन दिवसापासून का टाळती आहे. कुणास ठाऊक! पण काहीही असो, आज मी तिच्याशी बोलणारच. दुसरे खरंच काही सुचत नाही आहे. बोललो की सांगतो!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत