कुठे आहे राज ठाकरे?

आज दुपारी रायपूरमध्ये मराठी मुलांना मारहाणीची बातमी वाचली. वाचून डोकच फिरलं. थोडा वेळ काय करू आणि काय नको अस झाल होत. माझ्या काही मित्रांना ती बातमी दाखवली. त्याचं पण डोक सरकल असाव. त्यावर ते मला म्हणाले की ‘आता कुठे आहे राज ठाकरे?’. त्यांना म्हणालो की ‘राज ठाकरेंनी काय ठेका घेतला आहे का मराठी माणसाचा?’ काही झाल की ‘कुठे आहे राज ठाकरे?’. मग त्यांना म्हणालो की ‘आता का काही बोलत नाहीत?, ठाण्यात परप्रांतीयांना ठोकलं तर, राज गुंड. आणि ते परप्रांतीय कसे पापभिरू ह्याचे प्रवचन ऐकवलं होत. आता ते चुकीचे होते तर आता हे चुकीच नाही का?’ मग कुठे काही म्हणतात.

नाही तरी उद्या दिसेलच राज ठाकरे कुठे आहे ते. मी काही मनसेचा समर्थक नाही. पण जो कोणी मराठी माणसाची बाजू घेईल त्याची बाजू घेणे हे मराठी माणसाचे कर्तव्य आहे. असे मी मानतो. मग उद्या सोनियाने जरी घेतली तरी. पण बघा आता कोणता मानव अधिकार आयोग केस दाखल करणार नाही त्या रायपुरकरांवर. ना कोणता अमरसिंग, आणि ना पंतप्रधान दुख व्यक्त करणार. आणि हो संसदेत या कारणाने गोधळ सोडाच पण चर्चा होईल का नाही याचीच शंका वाटते. मराठी मुलांची हत्या होते, त्यांना मारहाण होते. हे काही देशविघातक कृत्य नाही. पण जर कधी भय्याला मारले तर मात्र. सुरु होते, की देश सगळ्यांचा, कोणी कुठेही जाऊ शकते. घटनेने तो अधिकार दिलेला आहे. मराठी माणूस चिडला की भाषावादी, प्रांतवादी. आणि झारखंडवाले चिडले की त्यांचे प्रांतप्रेम. उरली गोष्ट माझ्या मित्रांची, त्यांना काय वाटले असेल देव जाणे. पण असले मराठी असण्यापेक्षा नसलेले चांगले. काय बोलणार मी त्यांना. मुर्दाड देशप्रेमी. खूपच जास्त चिडचिड होते आहे माझी आज. परप्रांतीयांना काही बोलायचं नाही. म्हणे महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी हातभार लावला आहे. मुळात महाराष्ट्राचा विकास झाला हे छातीठोकपणे मुख्यमंत्री देखील बोलू शकत नाही. आणि काय गोडवे गात असतात हे, परप्रांतीय म्हणे कामसू असतात. आमच्या कंपनीत माझे परप्रांतीय सहकारी त्या फेसबुक आणि जीताल्क मधून बाहेर पडतील तेव्हा ते काम करतील ना. आणि म्हणे विकासात सहभाग आहे.

रस्त्यावर सीड्या काय मराठी विकतात? हे तर सोडाच पुण्यात भिकारी खूप वाढले आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यापैकी कोणालाही मराठी येत नाही. जाऊ द्या आज माझ चित्त खवळाल आहे. अरे हो तुम्हाला आनंदाची बातमी तर सांगितलीच नाही. त्या लोनवाल्याने माफी मागितली आणि त्याच्या हेडने देखील. पैसे पण मिळाले वापस. आणि खोट बोलण्याचा मग प्रश्नच उरला नाही. नाही तरी मला दिलेल्या रीप्ल्यायात एकाचा रीप्ल्याचा मी अनुकरण केल. छान होता रिप्ल्याय. आणि तो फोन्ट देखील मिळाला मला. एका दोस्ताने त्याचे नाव दिले मला. सगळ अगदी छान चालाल होत पण दुपार नंतर डोक भडकून गेल. असो शांत झाल्यावर बोलू.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत