गुड मॉर्निंग

कालची रात्र बद्दल बोलायलाच नको. कालचा दिवस देखील तसाच. अगदी सगळ संपल इथपर्यंत या डोक्याने आणून सोडलं होते. काल तिला ‘बाय’ करतांना किंवा ‘हाय’ करतांना खुपंच वेगळे वाटत होते. म्हणजे अस की, तिला माझा त्रासाच होतो आहे, अस. खूप डोक दुखायला लागलं होत. काल दुपारी देखील माझे मित्र मला, अप्सराच्या विषयावर आम्हाला बोर करू नको अस बोलले. आणि त्यात मी जातांना तिने अगदी त्रासलेल ‘बाय’ केल. खूपच डोक दुखायला लागलं होते. रात्री जेवायची इच्छाच होत नव्हती. पण गेलो. रात्री झोपच नाही आली. मागील शनिवारी देखील असंच. झोपच नाही आली. रात्रभर तिचाच विचार. काल देखील तेच. फरक फक्त इतकाच यावेळी डोके इतके दुखले ना! की रात्री दोन तासाचा शास्त्रीय (रड) संगीताचा कार्यक्रम केला. तरीही तीचा विचार कमी झाले नाही. डोक्याने विचार केल की ती मला मिळणेच शक्य नाही अस वाटायला लागलेलं. पण शेवटी मुर्ख मन सगळ पुन्हा जैसे थे, करून टाकते. कामातही लक्षच लागलं नाही.

काल त्या टेन्शनमध्ये, चुकीच्या बाजूने गाडी काढली. असो, आणि ट्राफिक पोलिसाच्या समोर चौकात पुन्हा गाडी दुसऱ्या बाजूला आणली. हे तर सोडाच, सिग्नलला त्या पोलिसासमोर मी झेब्रा क्रॉसिंगच्या बराच पुढे उभा होता. आणि चिंचवड नाक्यावर ट्राफिक पोलिसासमोर गाडी इकडे तिकडे न पाहता वेगात नेली. खूप म्हणजे खूप मनात गोंधळ. रात्री मनात कसले सुद्धा विचार. तिची खूप आठवण वाढलेली. सगळ संपल असंच झालेलं. सगळया आशा संपल्या. रात्री दोनच्या कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठलो त्यावेळी मोर्निगची बस चुकलेली. खर सांगायचे झाले तर, आज कंपनीत जायची देखील इच्छाच होत नव्हती. कंपनीला ‘जय महाराष्ट्र’ करावं इथपर्यंत डोक्याची मजल गेलेली. आज दाढी करण्याची इच्छा झाली नाही. तसाच रडका चेहरा घेऊन आलेलो. बसमध्ये हेडफोन लावून खूप मोठ्या आवाजात गाणे ऐकत बसलो होतो. डोक्यात काहीच विचार येऊ नये म्हणून. कंपनीत आलो. आणि काय सांगू, आज ती! काय दिसत होती. म्हणजे तिला पाहिल्यावर सगळंच बदलून जात यार!

मी माझ्या डेस्ककडे चाललेलो. आणि ती तीच्या डेस्कवरून दुसरीकडे चाललेली. माझ्या समोर आल्यावर माझ्याकडे हसून ‘हाय, गुड मॉर्निंग!’. खरंच दोन सेकंदासाठी शॉक दिल्याप्रमाणे झटका बसला. तिला घोगऱ्या आवाजात ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं. म्हणजे मुद्दामहून नाही. पण आवाज गेला होता. सगळंच छान वाटायला लागलं मग. मी म्हटलं होत ना, एक मित्राचे काम राहिले होते. ते फटाफट संपवून टाकले. दुपारी नव्या कॅन्टीनमध्ये जेवायला जावू म्हणून मित्राला तयार केले. ती नेहमी तिथेच जेवते. तो नको नको करत होता. पण माझ्या आग्रहाने झाला तयार. ती नवीन कॅन्टीन कंपनीच्या दुसऱ्या इमारतीत आहे. मी ह्या इमारतीतून बाहेर पडायला आणि ती त्या दुसऱ्या इमारतीतून एकच वेळ झाली. तिचे लक्ष नव्हते. पण मग तिकडे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. मित्राने देखील बघितले. पुन्हा आपल्या जुन्याच कॅन्टीनमध्ये गेलो. जेवण करून आलो. पाण्याची बाटली भरून, मित्राच्या डेस्कजवळ उभा होतो. ती त्या बाजूने चाललेली. मी आज तीच्या समोर जाण्याची हिम्मत केली.

समोर आल्यावर माझ्याकडे पाहून हसली. मी आपला मुली तरी बऱ्या हसतील. लाजल्याप्रमाणे हसलो. आणि डेस्कवर जाऊन बसलो. दुपारी माझ्या लहान बहिणीशी खूप वेळ फोनवर गप्पा मारत बसलो. पुन्हा डेस्कवर येतांना ती तीच्या मित्राच्या डेस्कजवळ उभा राहून माझ्याकडे पहात होती. काय सांगू तिची नजर. तिच्याशी बोलावं, अशी खूप इच्छा होती. जाण्याअगोदर बोलावं म्हणून तीच्या डेस्कवर गेलो. पण ती फोनवर. नुसतेच बाय म्हटले. पण तिचे हास्य अजूनही डोळ्यासमोर आहे. किती गोड! आज गाडी एकदाही बंद न पडता आणली. आणि कुठेही चुका न करता. सकाळपर्यंत सगळंच खराब वाटत होते. पण तीच्या हास्याने सगळंच छान करून टाकले आज. उद्या नक्की बोलेले. आणि बिनधास्त. ती खूप छान आहे. आता पुन्हा आशा वाटते आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत