थ्री इडियट्स

चित्रपट सुरु होतो. मुलायम कुरेशी विमानात बसून फोनवर बोलत असतो. अचानक त्याला त्रास व्हायला लागतो. विमान दिल्ली विमानतळावर उतरवले जाते. डॉक्टर मुलायम कुरेशीला घेऊन जात असतांना अचानक तो उठतो आणि डॉक्टरांना म्हणतो ‘मी ठीक आहे. तुम्ही जा. मी स्वत: माझ्या घरी जाईल’. विमानतळ सोडून आपल्या मित्राला म्हणजे शरद रस्तोगीला फोन करून बोलावून घेतो. दोघेही आपल्या ठरलेल्या ‘मुघल’ गार्डनमध्ये पोहचतात. दोघही धावत पळत त्या नेहमीच्या भेटीच्या ‘मॉर्निंगवॉक’ मैदानावर येतात. तिथ त्यांची चतुर बनर्जी वाट पाहत असते. दोघांना धावत येतांना पाहिल्यावर मोठ्याने ‘या इडियट्स’ असे म्हणते. दोघेही इडियट्स तिच्याकडे पाहत उभे राहतात. मग चतुर म्हणते ‘कुठे आहे तुमचा तिसरा इडियट?’. दोघेही एक दीर्घ श्वास सोडतात. चतुर थोडंस हसून ‘मला माहिती होत की तो येणार नाही.’

हे बघा म्हणून चतुर त्यांना आयफोनमधील रेल्वेचे फोटो दाखवते. ते फोटो बघून मुलायम कुरेशी चिडतो. आणि म्हणतो ‘लान्चो कुठ आहे?, मागील निवडणुकीच्या निकालापासून आम्ही त्याला शोधात आहोत. कुठे आहे लान्चो? त्या लान्चोसाठी मी विमान आणि हा विजार सोडून आला आहे.’ चतुर खळखळून हसते आणि म्हणते ‘अजून दुसर काय होत सोडायला?’. मग शरद रस्तोगी विचारतो ‘कुठे आहे लान्चो?’. मग चतुर म्हणती ‘माझ्या सोबत चला, मी दाखवते’. मग तिघेही चतुराच्या ‘एक्सप्रेस’ मध्ये बसतात. आणि प्रवास सुरु होतो. जातांना एक ‘भागती भैससा था वो..’ अस गाणही होत. त्या गाण्यात मुलायम कुरेशी बुडून जातो. त्याला तो सगळा जुना इतिहास आठवायला लागतो.

लान्चो ने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पोलिटीक्समध्ये घातलेला गोंधळ. त्याने केलेला चारा घोटाळा. मनमोहन सहस्त्रबुद्धे सरांना दिलेला त्रास. पार त्या सोपिया सोबत त्याने मागच्या निवडणुकीच्या आधी गायलेलं ‘मंबई डुबी मुंबई डुबी पाम्परा..’. सगळ सगळ आठवत. ह्या सगळ्या विचारात गुंग असतांना एक्स्प्रेसचा मोठ्या आवाजात होर्न वाजतो. आणि मुलायम कुरेशी भानावर येतो. गाडी पटना स्टेशनवर येते. तिघेही उतरतात. चतुर एका व्यक्तीला ‘लान्चो की कॉर्बे?’ अस विचारती. त्यावर शरद रस्तोगी चतुरला ‘यीन्हा लान्चो काहे राहत है?’  अस विचारायला सांगतो. तो व्यक्ती डोंगराच्या एका बाजूला असलेल्या मोठ्या गोठ्याकडे बोट दाखवतो. तिघेही धावत पळत तिथे जातात. तिथ जाऊन बघतात तर लान्चो ऐवजी त्या गोठ्यात रान्चो असते. सुरवातीला लान्चो बद्दल काहीच सांगत नाही. पण जेव्हा कुमारचे नाव सांगितले जाते. त्यावेळी मात्र रान्चो सगळ खर सांगते.

मग तिघे पुन्हा गंगेच्या किनारी निघतात. लान्चो तिथे आहे अस रान्चो ने सांगितले असते. जाता जाता लक्षात येत की सोपियाला बरोबर घेतलच नाही. सोपियाच्या घरी फोन करतात तर तिथे सोपिया ऐवजी माया भेटते. तीच्या सांगण्यावरून तिघे पुन्हा उत्तरेत जातात. जिथे सोपियाचे भाषण असते. तिथून तिला घेऊन चौघेही. गंगा किनारी येतात. तिथे त्यांना हा गंगेचा छोरा ‘लान्चो’ भेटतो. मग सोपिया लान्चोच खर नाव विचारते. त्यावेळी लान्चो त्याच खर नाव ‘लालुसुख यांन्गडू’ अस सांगतो. मग सोफिया त्याला ‘लेडी बिल’ बद्दल ऑपोज का करत नाही अस विचारते. लान्चो खुश होतो, त्याला काही तरी जुनी गोष्ट नवीन तंत्रज्ञानाच्या समोर करायला मिळणार म्हणून ‘होली’ करून मनमोहन सहस्त्रबुद्धेला भेटायला दिल्लीत येतो. आता यापुढचा चित्रपट तुम्ही पाहत आहात. हा चित्रपट संपतांना ‘सारी उम्र हम पोलिटीक्स कर करके जी लिये.. अब तो हमे यादवी करने दो .. ना ना ना..’ हे गाणं होत. आणि मग ‘ लेडी बिल इज वेल’ होत..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत