दिवाळी आणि फटाके

आजपासून कंपनीची दिवाळी सुट्टी सुरु झाली. दोन दिवसापूर्वी माझ्या मित्राला डोळ्या खाली भाजल होत. त्याला विचारलं ‘काय झाल? कशामुळे भाजल?’ त्यावर तो म्हणाला ‘काल फटाके उडवताना फटका ठिणगी माझ्या डोळ्याखाली आली. त्यामुळे भाजल’. काल घरी येत असताना एका ठिकाणी बरीच चिल्लर पार्टी जमा झाली होती. त्यांचे काही तरी बोलणे चालले होते. मग त्यातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणाला ‘तुम्ही कोणी येऊ नका, मी जाऊन त्याला मागतो’. अस म्हटल्यावर इतरांनी मान डोलावली. मग तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फटाके उडवत असलेल्या त्याच्यापेक्षाही मोठ्या मुलाकडे गेला. हा काही बोलणार तेवढ्यात हे चिल्ले पिल्ले मागून रस्ता ओलांडून त्याच्या मागे उभे. हा त्या फटका वाजवणाऱ्या मुलाला म्हटला ‘ए आम्हालाही फटाके दे ना राव’. ऐकून हसू आले. पण त्याहून अधिक हसू त्या मुलाने फटाका लावला की ही सगळी पार्टी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळून जायची. आणि दुसरा फटाक्याची वात पेटवताना  फार जवळ जाऊन जणू काही आता त्यावर संशोधनच करत आहे असा आविर्भाव आणून बघायची. आणि पेटला की रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पळायची. अस चालू होत. बघून हसू की रडू अस झाल होत.

आज रात्री आमच्या गल्लीत दोन लहान भाऊ बहिण असतील. एक फटका लावायचा प्रयत्न करत होते. बर त्या दोघांनी तो सुतळी बॉम्ब रस्त्याच्या मध्ये ठेवला होता. येणारा जाणारा एक मिनिट थांबायचा, वाट पाहायचा की आता पेटवतील, आता पेटवतील पण ह्यांचा फटका काही पेटायचे नावच घेत नव्हता. हे दोघे भाऊ बहिण एवढे भित्रे की नाही पेटला तरी मागे पळायचे. अस बराच वेळ त्यांचा खेळ चालला होता. बघणारा शेवटी हसत हसत निघून जायचा. आता कोणत्याही गोष्ट साजरी करायची म्हटली की फटाके उडवून आनंद साजरा करतात. पण दिवाळीत ज्या पद्धतीने फटाके वाजवले जातात त्याच्यापुढे बाकी सगळे फिके. आता दिवाळी आणि फटाके यांचे नाते कधी जुळले हे सांगण कठीण आहे. पण हे अतूट बंधन कधी तुटणार नाही हे नक्की. आता अनेक वेळा आपले ”इको फ्रेंडली’ वाले फटाके उडवू नका. प्रदूषण वाढते, पर्यावरणाला धोका पोहचतो. अशा कोरड्या आणि स्वत कधीच न पाळणाऱ्या गोष्टी बरळत असतात. दिवाळीत आणि गणपतीत यांना प्रदूषण दिसते. रोज रस्त्यावर चालणारे प्रदूषणाचा नंगा नाच दिसत नाही. हे स्वत गाड्या वापरणार आणि दुसऱ्याला ‘सल्ले’. सोडा मी देखील कुठे फटाके उडवतो? पण माझा फटाके उडवण्याला काहीही विरोध नाही आहे. सण आपला, मग तो कसा साजरा करायचा हे आपणच ठरवायचे. दुसऱ्या कोणी ‘इको फ्रेंडलीने’ नाक खुपसू नये.

मी आठवीत असताना पणतीच्या ज्योतीवर एक फटाक्याची दारू असलेला एक कागदाचा तुकडा धरला होता. आता त्यावर असलेली फटाक्याची दारूमुळे तो पटकन पेटला. पण मी तो फेकेपर्यंत माझ्या उजव्या हाताला तो चिटकला. त्यामुळे मला भाजले. तेव्हा पासून आतापर्यंत मी कधीही फटाके उडवले नाहीत. आणि माझ बघून माझ्या लहान भावाने देखील तेव्हापासून फटाके उडवण बंद केल. ते अजून देखील कायम आहे. पण याचा अर्थ असा नाही की माझा फटक्याला विरोध आहे. पण दिवाळीत उडणारे फटाके बघून मन प्रसन्न होते. आणि याच तर आपल्या काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण इतर देशांपासून वेगळे आणि विलोभनीय ठरतो. बाकी नेहमी मला दिवाळीच्या वेळी आठवते की माझ्या एका मित्राने दिवाळीत ‘रॉकेट’ पेटवले आणि ते उडून त्यांच्याच घरात गेले. मग काय पुढे त्याच्या आईने त्याला चांगलाच फोडून काढलं. पण बाकी मजा येते. फटाके आणि दिवाळी जणू एकच वाटते. आणि फाटक्या विना दिवाळी म्हणजे आवाज विना चित्रपट. अरे हो,

तुम्हाला, तुमच्या कुटूंबियांना, मित्रांना, आप्तेष्टांना व नातेवाईकांना, सर्वांनाच ही दिपावली आनंदाची जावो; येणारे वर्ष समृद्धीचे व भरभराटीचे जावो ही सदिच्छा!
पुन्हा एकदा दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत