पुण्याची लोकल म्हणजे कचरा गाडी

मागचा अख्खा आठवडा सात वाजता पुणे स्टेशनवरून सुटणारी पुणे लोणावळा लोकल साडेसातच्या आत पुणे स्टेशनवरून सुटली नाही. रोज लोक लेखी तक्रार करून देखील, लोकल काही वेळेवर येत नव्हती. शुक्रवारी रात्री तर कहरच. रेल्वेचे कर्मचारी तक्रार देखील लिहून घ्यायला तयार नव्हते. शेवटी सगळे प्रवासी लोक त्यात मी देखील पुणेस्टेशन प्रबंधकाच्या केबिन मध्ये गेलो. सगळे फार चिडलेले होते. आम्हाला बघताच प्रबंधक साहेबांनी फोनाफोनी चालू केली. लोकल कुठे आहे? का अजून स्टेशन मध्ये अजून का नाही आलेली?. त्यांना तक्रार लिहून घेतली नाही कळताच त्या स्टेशन प्रबंधकाने त्या रेल्वे कर्मचाऱ्याला झापलं. खर तर मला त्याच्या झापून देखील समाधान होत नव्हत. मला वाटल होत की स्टेशनप्रबंधक ‘ अटल बिहारी’ असेल. पण तो मराठी होता.

एवढाच काय आमच्यातील एक त्याला इंग्लिशमध्ये लेक्चर द्यायला लागला तर तो त्याला मध्येच थांबवून ‘आपल साध सरळ मराठीत बोला. सगळ्यांना समजायला सोप जात’ अस म्हणाला. आम्हाला लेखी तक्रार द्या अशी विनंती केली. लोक फार चिडलेली होती तक्रार करून काही फायदा होत नाही. मी शांत उभा होतो. खर तर मला माझ्या बाजूची ख्रुची उचलावी आणि त्या प्रबंधाकाच्या समोर असलेला टेबलवरील काच फोडावी अस विचार येत होता. त्या प्रबंधाकाच्या ऑफिस मध्ये काचेच्या गोष्टी खूप आहेत. मी त्या प्रबंधाकाच्या समोरच उभा होतो. आणि मनात आणल असत थोडा झुकून त्याची मान पण हातात आली असती. पण तो ठरला आपला मराठी. म्हणून शांत होतो. तो म्हणाला ‘लोकल म्हणजे कचरा गाडी आहे.’ प्रत्येक जण एका नंतर एक असा तावातावाने त्याला बोलत होता. आणि खरच आहे.

चेन्नई एक्स्प्रेस आली की लोकल बाजूला. कोणार्क एक्स्प्रेस आली की लोकल बाजूला. पावसाळ्यात मुंबईहून येणाऱ्या एक्स्प्रेस लेट होतात आणि त्यामुळे त्या उशिरा आल्या की त्यांना न थांबवता पाठविले जाते. मग लोकल कुठतरी कोपऱ्यात. अर्धा अर्धा तास एकाच स्टेशन मध्ये. नेहमी अस होत. सातची लोकल अशा उशिरा आलेल्या प्रगती, सह्याद्रीसाठी बाजूला कधी चिंचवडला तर कधी खडकीला थांबवले जाते. नाही तर कधी तळेगावला. तो स्टेशन प्रबंधक शांतपणे सगळ्यांचे म्हणणे एकूण घेत होता. नाही तरी त्याने आवाज वाढवावा एवढी कमी गर्दी त्याच्या ऑफिसमध्ये नव्हती. आमच्या पैकी एक जण लेखी तक्रार लिहित होता. मधेच एक स्कार्फवाल्या मेडम आल्या. आता स्कार्फ आणि पुणे तसं खूप मोठा इतिहास. नंतर बोलू या विषयावर.ती ने (नेहमीप्रमाणे म्हणजे पुण्यातील प्रत्येक मुलगी बोलण्याची सुरवात हिंदीतच करते) प्रबंधकला रागाविले. काय बावळतपणा आहे. पण जाऊ द्या. आधी लोक ज्या विषयावर त्या प्रबंधाशी बोलत होते तेच ती बोलली. लोकल का लेट होती रोज. आणि उशिरा येणार अशी एकदा तरी सूचना द्या. ते पण देत नाही म्हणून. लगेचच तिला आमच्यातील एकाने त्या लेखी तक्रारीवर सही करा अस म्हटला.ती न सही केली. नंतर अजून काही बायकांनी सह्या केल्या. सगळ्यांनी सह्या केल्या. अर्जात दोन मुद्दे नमूद केले की लोकल उशिरा येती आणि ती नऊ डब्यांची असल्याने गर्दी खूप होते. तरी ती बारा डब्यांची करा म्हणून. लोकल ७:४० ला आली आणि मला घरी पोचायला ८:२० झाले. आता पुण्याची लोकल खरच कचरा गाडी आहे. कारण माल गाडी देखील वेळेवर चालते पुण्यात. पण लोकल कधीच नाही. हा ‘कचरा गाडी’ हा शब्द माझा नाही त्या प्रबंधकाचा आहे. बघू आता तरी वेळेवर येते का ते. नाही तर मुंबईकरांचा आदर्श आहे डोळ्यासमोर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत