पेनचोरी

परवा मी रिलायन्सचे डेटाकार्ड खरेदी केले. काल दुपारी त्या रिलायन्सवाल्यांचा एक माणूस ते डेटाकार्ड द्यायला आला. सोबत एक फॉर्म देखील आणला. मी त्या फॉर्मवर सह्या केल्यावर मला रिसीट देण्यासाठी माझा पेन मागितला. आणि डेटाकार्ड देऊन निघून गेला. डेटाकार्ड घेऊन मी देखील जेवणासाठी कॅन्टीनमध्ये आलो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याच्याकडून पेन परत मागायचा राहूनच गेला. असो पाच रुपयांचा पेन होता. पेन जाण्याची महिन्याभरातील ही तिसरी वेळ आहे. माझ्या एका मित्राला एक आठवडा माझा लिहायला दिला. पुढच्या आठवड्यात पेन परत मागितला तर तो पेन माझाच आहे अस तो म्हणाला. आता अस म्हटल्यावर मी एका पेनसाठी का वाद घालत बसू म्हणून ‘ठीक आहे’ अस म्हणून दुसरा घेतला.

त्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये एकाला दिला. तर त्याने देखील तो परत केलाच नाही. मग हा तिसरा घेतला होता. आणि तो पण आज लंपास झाला. तसा माझा पेन चोरी होण्याचा इतिहास खूप मोठा आहे. कधी कधी वाटत माणसाच्या लक्षण मधील ‘दुसऱ्याचा घेतलेला पेन परत न करणे’ हे देखील लक्षण आहे की काय. आता हे लक्षण जवळपास माणसाच्या सगळ्याच जातींमध्ये आहे. माझ्या मागच्या कंपनीत हे नेहमी घडायचं.

पेन तर सोडाच माझ्या सिनिअरने माझी एक वहीच लंपास केली होती. पेन मारण हे त्याच्याकडून शिकव. बर पगार आणि वयाच्या बाबतीत तो खूप पुढे होता. नेहमी माझा पेन गायब झाला की तो कुठे असेल मी समजून जायचो. दुसरी ती बंडल, अरे हो बंडल हे तीच टोपण नाव. माझ्या मागच्या कंपनीत होती. खूप सुट्ट्या मारायची आणि कंपनीत आली की थापा. म्हणून आम्ही तिला लाडाने बंडल म्हणायचो. ती बंडल पेनचोरी करण्यात सराईत होती. आणि परत चोरी पकडल्यावर खूप भोळी आहे अस दाखवायची. एक दोन वेळा ठीक आहे. पण महिन्यातून एक दोनदा तिला राहावायाचाच नाही. आणि मग कधी तीच्या पिशवीत तर कधी तीच्या डेस्कमध्ये पेन जायचाच. सुरवातीला एक दोन वेळा दुर्लक्ष केल पण नेहमी नेहमी व्हायला लागल्यावर मग तीच्या डेस्कवरून डायरेक्ट उचलून आणायला माझ्या मित्राला मी सांगायचो. आणि मग ती त्याला तो पेन तिचाच आहे अस त्याला म्हणायची. आणि याच कारणाने तिला आम्ही बंडल म्हणायचो.

तिची एक मैत्रीण ती देखील तशीच. तिला लाडाने आम्ही ‘एम टीव्ही’ म्हणायचो. कारण काही ना काही फालतू आणि विचित्र प्रकार चालू असायचे. जे पाहून इच्छा वाढण्याऐवजी, ती इच्छाच मरून जायची. ती देखील नित्य नियमाने म्हणजे महिन्यातून एकदा तरी माझा पेन चोरी करण्याची इच्छा पूर्ण करायचीच. त्यामुळे या पेन चोरीचा अनुभव नवीन नाही. पण आता वाटत की पेन जवळ बाळगूच नये. कारण की पेन चोरीला गेला की नवीन घ्या. आणि तो ही असाच पुन्हा जाणार. आणि नवीन पेन फार दिवस टिकत नाही. कोणी तरी तो घेऊन जातोच. ते म्हणतात ना ‘दाने दाने..’ तस ‘पेन पेन पे लिखा है, चुराने वाले का नाम’.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत