बंदी आणाच

काय चुकलं ‘बाबा’ आणि ‘मन्या सवारी’चे? संघावर बंदी असायलाच हवी. मी तर म्हणतो, अभिनव भारतवर सुद्धा बंदी असायला हवी. इंग्रजांच्या राज्यात तर होतीच. त्याचबरोबर शिवसेनेवर देखील बंदी आणा. दहशतवादी संघटना आहेत ह्या सर्व. शिवसेनेची तर दहशत तर अख्या महाराष्ट्रभर आहे. विश्व हिंदू परिषद वाले आणि बजरंग दलवाले सुद्धा काही कमी नाहीत. त्यांच्यावर सुद्धा बंदी आणायला हवी. म्हणजे आपला देश खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ होईल. नाहीतर ह्या सगळ्या दहशतवादी संघटना देशाला पोखरून टाकतील. देशाचे किती मोठे नुकसान आहे. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्यावर बंदी आणावी. आणि त्यासोबत सिमी आणि इंडियन मुजाहिदीन सारख्या खर्या अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ संघटनांवरील बंदी उठवून अनुदान चालू करावे. त्यामुळे देशात होणारे हल्ले थांबतील. कस वाटत?

आपल्या देशाचे ‘राष्ट्रपती’पदी ह.भ.प. अजून काय असते ते प.पु अफझल ‘गुरु’वर्य विराजमान झाले तर? आणि देशाचा संरक्षणमंत्री पाक दा मुंडा, शेर कसाब. आता पंतप्रधानच म्हणणार होतो, पण ती गादी तर आधीच ‘बाबा राहू’साठी बुक आहे. त्यामुळे! पण परराष्ट्रमंत्री गिलानीच असायला हवेत. आणि परराष्ट्र सचिव अरुंधती मॅडम. तेच खर्या अर्थाने देशाची बाजू मांडू शकतील. कारण खर्या अर्थाने देशाचा इतिहास आणि भूगोल चांगलाच माहिती आहे. पहा, काश्मीर प्रश्नच राहणार नाही. वाटल तर लावा ‘पैंज’. गृहमंत्रीपद सालेमला द्यायला हव. तोच खर्या अर्थाने न्याय देऊ शकतो.

क्रीडामंत्री म्हणून ललित मोडी किंवा आपल्या सर्वांचे लाडके, गुटगुटीत, सुधृद बालक नामदार, जामदार, दामदार गारद गवार. दोघेही चांगल्या पद्धतीने देशाची क्रीडानीती योग्य प्रकारे ठरवू शकतील. बांधकाममंत्री पदासाठी बालमा..डी. त्यानां त्या गोष्टींचा अनुभव आहेच. मात्र हे करीत असतांना नरेंद्र मोदी या दहशतवाद्याला जाहीर फासावर लटकवायला हवे. आणि दुसरा ‘राज’ वर देशद्रोहाचा खटला भरायला हवा. लालूला कृषी आणि पशु मंत्रालय द्यायला हव. देशाचे महसूलमंत्री नारदमुनींना. कारण ‘लवासा’चे त्यांची प्रकरण खूप चांगल्या प्रकारे हाताळले. पहा जरा विचार करा. जर आपण देशाचे नावच बदललं तर?? ‘हिंदूस्थान’च्या ऐवजी ‘पाकिस्थान’ मस्त वाटत. वाटल तर पाक ने आक्षेप घेतलाच तर, पाकिस्थान खुर्द हे देखील चालेल आपल्याला. चीन आपल्याला रस्ते आणि क्षेपणास्त्रे फुकट बनवून देईल. आणि अमेरिका मुक्त हस्ताने मदत करेल.

हिमालयाचे नाव बदलून जिनालय, आणि गंगा नदीचे नाव बदलून ‘महात्मा गांधी नदी’? कस वाटते आहे पहा. राष्ट्रपित्याला अभिवादन ठरेल. अजून एक नवीन गोष्ट करायला हवी देशाची ‘राष्ट्रमाता’ म्हणून सोनी कुडी सोनियाजी. पहा त्या महान त्यागी कुटुंबाला तीच खर्या अर्थाने भेट ठरेल. एकाने देश स्वतंत्र केला. आणि दुसरीने ‘भगवा दहशतवाद’ मुक्त देश केला. दोघेही अजरामर व्यक्ती. आणि दर पाच वर्षांनी निवडणुका घेत बसण्यात काहीच अर्थ मला तर वाटत नाही. कारण निवडणुकीत, नेहमी आपण कॉंग्रेसलाच निवडून देतो. त्यामुळे नेहमी निवडणुका तशा अर्थहीन ठरतात. वाटल तर, वाटून द्या ना. गुजरात भाजपाला. बाकीचे सगळ कॉंग्रेसला देऊन टाका. किती खर्च वाचेल. विश्वास आहेच मुळी कॉंग्रेसवर. आणि काय करायचे त्या ‘घटनेचे’, त्याच्या ऐवजी ‘माझे सत्याचे प्रयोग’ प्रमाण मानावा. शरियत वापरून न्यायव्यवस्था सुरु करावी. म्हणजे सर्वांना समान नागरी कायदाचा वाद राहणारच नाही. पहा, एक बंदी किती क्रांती आणू शकते. त्यामुळे बंदी आणाच..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत