भन्नाट सरी

सकाळी चांगलेच उन पडले होते, पण जस जसा दिवस संपायला  लागला तस तसा अंधार आनाखिनच गडद व्हायला लागला. त्यात कामावरून निघायला मला उशीर झाला. कशी बशी एकदाची सात वाजताची लोकल मिळाली. पण दुर्दैव लोकल होती सातची आणि निघाली ७:३० ला. राग आणि निराशा दोघेही एकाच वेळी आल्यावर काय होत ते मला आज समजल. एक तर गेटवर जागा मिळाली, पण ती देखिल दुसर्या क्रमांकाची. खर तर मुंबईवरुन  आल्या पासून लोकलच्या गेटवर उभा रहायचे आणि ते देखिल पहिल्या क्रमांकाच्या जागेवर अशी (खोड) सवय लागलेल्या माणसाला, दुसर्या क्रमांकावर समाधान कसे होइल?

एकदाची काय ती सटवी (लोकल) निघाली. गाड़ी पुणे स्टेशन पासून शिवाजी नगरला आली. उशीर झाल्यामुले लोक अधश्या सारखे  कधी भेटलीच नाही अशा पद्धतीने चढू लागली. बघता बघता गाड़ी भरली. पुणेरी भाषेत सांगायचे झाल्यास ‘तोबा गर्दी’. आता गर्दी कशाला म्हणायचे हे मुंबईच्या लोकलकडे बघून मी शिकलो होतो.याकरिता मी काही त्यावर भाष्य करणार नाही.त्यात इथली पुण्याची माणसे, काही बोलण्यात सोय नाही. स्वताला जागा मिळाली म्हणजे झाल. दूसरा खड्ड्यात गेला तरी चालेल मग. अशी यांची प्रवृत्ति.

काही हत्तीच्या कानातून आलेले होतेच गेटवर उभा रहन्याचा हक्का काय फक्त यानंच आहे अशा आविर्भावात चला आत , चला आत अशा आरोल्या ठोकत आणि स्टेशन मधील लोकाना भीती दाखवत चढले. गाड़ी निघत असतानाच मेघराजाने त्याचा पेटारा खोलला. वा वा!!! त्याने त्याचा नगारा काही न वाजवाताच पावसाची सर बेधुन्धपणे अगदी न लाजता अगदी मोजुन मापून लईने नाचू लागली. धरणीने आनंदाने याचा उपभोग घ्यायला सुरवात केली. जिकडे तिकडे पानीच पानी. ‘येरे येरे पावसा, तुला देतो पैसा’ अस मी लहानपणी पावसात खुप नाचायाचो. ती आम्हाला शाळेत कविता होती. पण तरी देखिल ती आम्हाला खुप आवडायची. मग थोडा मोठा झाल्यावर पावसात भिजण्यासाठी शालेतुन येताना, तर कधी घरातील पानी फेकंयासाठी अशा अनेक कारणाने मी या लहरी बरोबर नाचलो आहे. कोर्स करत असताना स्वप्न सुंदरीच्या बरोबर, कधी तिच्या पुढे, तर कधी मागे, अस अनेक क्षणी या पावसाने, या लहरिने मला सोन्याचे क्षण दिले आहेत. बापरे, किती मोठा प्रवास मी काही क्षणात पूर्ण केला. सम्पूर्ण जीवनपट माझ्या डोळ्या समोर येउन गेला. पण या मधल्या वेळात खडकी स्टेशन आले. लोकल तिथून निघाल्यावर सरीन आजुनच ताल पकडला. तिच्या बरोबर आता वारयाने देखिल त्याचा वेग वाढवला.

हे इकडे असे सृष्टीचे विलक्षण दृश्य चालू होते आणि इकडे मात्र आमचे गेट्विर भिजन्याच्या भीतीने लोकाच्या आत जाण्याचा अपयशी प्रयत्न करत होते. ही एक खासियत. गेटवर उभा तर रहायचे पण भिजायला नको. पाउस पडायला हवा पण मी कामाला जाताना किंवा येताना नको. थोडक्यात काय शिवाजी जन्मावा पण शेजारी. अशी यांची प्रवृत्ति. मग दापोडिला आणखिन एक बह्हादर चढले. ते तर काही विचारूच नका. त्यांच्या समोर दोन मराठी बोलणारी मुले उभी आणि हे त्याना विचारतात की बारिश है क्या?. वा रे वा पुणेकर. गाड़ी कासारवाडी वरुन  निघून पिंपरी आली. तिथे खुप लोक उतरतात. हे महाशय गेटवर असल्याने उतरले. आणि गाड़ी निघताना आतून दोन जन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे बाहेरून त्याना आत कसे ठेवावे यावर बाहेरच्या बरोबर चर्चा करत होते. बघून त्याना एक कानाखाली द्यावी असेच वाटले. पण पावसाच्या आणि मेघराजच्या कृपेने माझा राग शांत झालेला होता. मी माझ्या स्टेशनवर  उतरून सरींचा आनद लूटत घरी पोहोचलो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत