माझे नाव पुढील पानावर

मी आठवीत असताना, माझ्याकडे जी पुस्तके होती त्यात इतिहासच एक पुस्तक होत. माझ्या वडिलांनी मला कधीच नवी कोरी पुस्तक आणली नाही. त्यांचे एक मित्र होते. त्यांच्या मित्राचा मुलगा माझ्यावरच्या इयत्तेत होता. तो आधी अभ्यासक्रमाची पुस्तके वापरायचा आणि वर्ष संपल्यावर तो मला ती सगळी पुस्तके मला वापरायला द्यायचा. आणि माझ वर्ष संपल्यावर मी त्याच्या बहिणीला ती द्यायचो. ती माझ्यापेक्षा एका वर्षांनी लहान व माझ्या खालील इयत्तेत. आमच दरवर्षी अस चालायचं. मी आठवीला गेलो तेव्हा माझी सातवीची अभ्यासक्रमाची पुस्तक त्याच्या लहान बहिणीला दिली. आणि आठवीची अभ्यासक्रमाची पुस्तके आणली.

इतिहासाचे सर आम्हाला पुस्तके आणायला सांगत. त्यामुळे बळजबरी न्यावे लागायचे. एक तर मी एवढा हुशार, त्यात ती पुस्तक. परीक्षेच्या दहा दिवस आगोदर त्याच्या वरील धूळ झटकायचो. एकदा चाचणी परीक्षेतील भूमिती विषय सोडला तर कधी नापास झालो नाही. एवढंच काय ते माझ शौर्य. रोज इतिहास विषयाचा तास असायचा. त्यामुळे ते इतिहासच पुस्तक रोज न्यावेच लागायचे. एके दिवशी आमच्या इतिहासाच्या सरांना काही काम असल्याने त्यांनी आम्हाला झालेले धडे वाचून काढायला सांगितले. मग काय करणार पुस्तक उघडावे लागले. पहिले पान उघडले. पहिला धडा वाचायला सुरवात केली. पानाच्या शेवटी पेन्सिलीने लिहील होत ‘माझे नाव पान क्रमांक २१’. म्हटलं बहुतेक आधीच्या मुलाने लिहील असाव. उघडले पान क्रमांक २१. तिथ देखील अस लिहील होत ‘माझे नाव पण क्रमांक २४ वर पहा.’ आता उत्कंठा वाढली होती. पटकन पान क्रमांक २४ उघडले. तिथ लिहील होत ‘माझे नाव पाहायचे असेल तर पण क्रमांक ५१ पहा’. झाल ५१ पान क्रमांक उघडल. तिथ लिहील होत कि ‘माझे नाव इथे नाही पाहायचे असेल तर पण क्रमांक १२२ उघडा’. ते देखील उघडून बघितलं. नंतर त्यावर लिहिलेलं होत ‘माझे नाव शेवटच्या पानावर’ . झाल मी पुस्तकाच शेवटच पान उघडल.

त्यावेळी उत्कंठा फार शिगेला पोहचली होती. पहा तो तर त्यावर ‘माझे नाव काहीच नाही’ त्याच्या पुढे लिहिलेलं होत ‘तुम्ही फसला हा हा हा’. पाहून हसू फुटले. त्यानंतर मी माझ्या प्रत्येक मित्राला ते पुस्तक मुद्दामहून दाखवायचो. ते देखील पान उलटत राहायचे. आणि हसू लागले कि मी समजून जायचो कि शेवटच पान बघितलं वाटत. हे आज यासाठी आठवल कि आज माझ्या एका मित्राला एक पुस्तक हवे होते. आणि ते मी आणायला गेलो होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत