मा. डॉ. मुन्नी सिंह यांचे आवाहन जसच्या तस्

राम जन्मभूमी – बाबरी मशीद शीर्षकाच्या दावाच्या उच्च न्यायालयाचा निकाल दि. ३०-९-२०१० रोजी अपेक्षित आहे. हा निकाल म्हणजे एका दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेचे निष्पन्न असेल. हे वेगळे सांगावे लागू नये की, सदर निकालाचा सर्वाधिक आदर केला गेला पाहिजे. हा निकाल झिडकारून द्यायला तुम्ही कृषिमंत्री किंवा पंतप्रधान नाहीत. विसरलात का? तुमची शॉर्ट टर्म मेमरी झालीये. आमीर सारखी. चला मी आठवण करून देतो. मध्यंतरी, सर्वोच्च न्यायालयाने धान्य सडण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा असा आदेश काढला होता. आणि आम्ही तो आदेश ‘धुवे में उडा दिया’.

ही आमची पाहिली वेळ नाही आहे. या आधीही असंच जनाब कसाब आणि गुरु अफजल महाराजांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. पण आम्ही ‘श्रद्धा आणि सबुरी’चा मार्ग अवलंबला आहे. कोणी तरी यावं, कोणाचे तरी अपहरण करावं. आणि त्यांच्या बदल्यात हे दोन ‘पाक जिहादी’ मागावे याचीच आम्ही वाट पहात आहोत. पण तुम्ही मात्र जो काही आदेश येईल त्याचे पालन करायला हवे. त्याच वेळेस, आपण हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे की, या स्तरावर हा निकाल म्हणजे न्याय प्रक्रियेतील एक पाउल आहे. ती गोष्ट वेगळी हे पाउल पडायला आमच्या न्यायालयाला साठ वर्षे लागली. मला माहिती आहे की, या साठ वर्षात अनेक बाळाचे आजोबा बनले. आणि नंतर त्या ‘लाला’ला ‘प्यारे’ झाले. सर्व ‘पशु’ पक्षांनी स्वीकारल्याशिवाय, या निर्णयावर सर्व पक्षांची संमती मिळाल्याशिवाय या प्रकरणातील मुद्दा संपुष्टात आला असे ठरत नाही.

जर कोणत्याही पशुपक्षाला वाटले की, पुढील न्यायालयीन विचार होणे आवश्यक आहे, तर यासाठी कायदेशीर उपाय उपलब्ध आहेत ज्याचा शोध येईल. वाटलं तर सीबीआयला शोध कामाला लावू. नाहीतरी आजकाल विरोधकांचे काम त्यांनी तमाम केलेच आहे. आणि आता ते मोकळे आहेत. हे लक्षात ठेवून, भारतातील तुम्ही सर्व रंजले गंजले नागरिकांनी आणि घटकांनी निकालानंतर ‘मनाचा’ समतोलपणा आणि प्रशांतता राखली पाहिजे. कारण, गोंधळ केला तर माझ्या बापाचे/मॉमचे काय बिघडत नाही. कोणत्याही एका घटकाने दुसऱ्या घटकाला प्रक्षोभित करण्याचा प्रयत्न करू नये. किंवा दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जातील अशा कोणत्याही प्रकारे आपल्या भावना व्यक्त करू नये.

भारताच्या सर्व नागरिकांना सरकार आवाहन करीत आहे की त्यांनी, न्यायदानाच्या प्रक्रियेकडे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून योग्य पद्धतीने पहावे. समाजाच्या सर्व घटकांनासुद्धा सरकार अपील करित आहे की, त्यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर शांतता आणि सुव्यवस्था राखावी. आता ती आहे की नाही हा वादाचा विषय होवू शकतो. भारतीय संस्कृती आणि सर्व धर्मांचा आदर बाळगण्याच्या भारताच्या उत्तुंग परंपरेचे पालन सर्वांनी या प्रसंगी करणे आवश्यक आहे. भारत आता समावेशक प्रगतीच्या दिशेने ठामपणे आणि निश्चयीपणे वाटचाल करीत आहे. तुम्ही पहातच असाल. भाववाढ, महागाई, हल्ले, लोकांच्या हत्या आणि काश्मीरमध्ये दंगे हे त्याचेच उदाहरण आहे. याची संपूर्ण जग दाखल घेत आहे. आपली ध्येये आणि आपल्या उद्धिष्टांपासून आपल्याला लांब नेणारे असे काहीही बोलले जाऊ नये किंवा केले जाऊ नये किंवा घडवले जाऊ नये. फार काही बोलत नाही, कारण मॅडमच्या घरचे संडास साफ करायचे बाकी राहिले आहे. आणि झाडलोट पण बाकी आहे. चला चलतो..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत