सामना

वेलकम, आजच्या इंडिया आणि कश्मीर (जम्मू नाही) यात क्रिकेटचा एक लंगोटी सामना होत आहे. माझ्यासोबत, कॉमेंट्री बंकरमध्ये आहे ‘चंद्र’ शास्त्री. सामन्याच्या आधी आपण खेळपट्टीची पाहणी करूयात. काय वाटत चंद्रा? चंद्रा ‘वेल, इफ यु सी इन पीच, देअर आर सो मेनी घाटी अन् स्टोन्स’. ‘थांक्स, चंद्रा’. आता आपण डायरेक्ट मैदानात पाहुयात कोण टॉस जिंकते आहे. टीम इंडियाचा कॅप्टन ‘ओमर दुल्हा’ (छापा) आणि काश्मीरचा कॅप्टन पाकलानी (काटा) यांच्यात टॉस होत आहे. पाकलानी ने चारणे हवेत फेकले आहेत. आणि ‘काटा’. सामन्याचे (पोपट)पंच जनाब नापाक यांना पाकलानी यांनी गोलंदाजी घेण्याचा निर्णय कानात सांगितला आहे. अरे हे काय, ओमर दुल्हा काही तरी बडबड करीत आहेत. त्यांचे मत जाणून घेऊयात. ओमर दुल्हा ‘हा अन्याय आहे. हे चारणे बच्चन छाप आहेत’.

(पोपट) पंचांनी खेळ सुरु करायची आज्ञा केली आहे. टीम इंडियाची यादी पाहुयात, सामन्याची सुरवात वीरेंद्र चिदंबरम आणि मनमोहनसिंग तेंडूलकर करीत आहेत. त्यापुढे वन डाऊन ओमर दुल्हा, त्यापुढे मोईली गंभीर, युवराज गांधी बाकीचे खेळाडू अजून ठरायचे आहेत. त्याची यादी आज हायकमांड ठरवतील ती असेल. त्याचे सर्वाधिकार त्यांनाच दिले आहेत. कश्मीरची गोलंदाजी बघुयात. सुरवात पाकलानी करतील. पुढची ओव्हर देखील तेच टाकतील. अरे हे काय, सगळ्याचं ओव्हर.. सामना ओवर झाल्याखेरीच त्यांची गोलंदाजी असेल. सामन्याचे प्रायोजकत्व पाकिस्तान सरकार , पाकिस्तान लष्कर आणि आएसआय आहे. सामन्याला सुरवात झालेली आहे. पहिला चेंडू पाकलानीचा वीरेंद्रला, आणि ‘व्हाईट’. दुसरा चेंडू आणि तो देखील व्हाईट. दोन धावा न काढताच टीम इंडियाच्या खात्यात जमा.

पुढचा चेंडू आणि वीरेंद्र चिदंबरमचे डोके. ओह्ह!!! नो बॉल. हो, तो चेंडू नव्हताच ‘दगड’ होता. पुढचा ‘दगड’ आणि वीरेंद्रची पाठ.. पुढचा दगड आणि चिदंबरमचा चष्माचा फटका. अरे हे काय, वीरेंद्र चिदंबरम एक धाव. अरे हे काय, वीरेंद्र धावपट्टीवरून पळत सुटले आहे. काय म्हणणे आहे तुझे यावर चंद्रा शास्त्री, ‘इट्स रेली अन्..एक्स्पेक्टेड’. एक ओव्हर नंतर इंडिया ३ /०. पुढच्या ओव्हरला सुरवात झालेली आहे. एक काश्मिरी तरुणाच्या हातात दगड देण्यात आला आहे. वीरेंद्रच्या जागी टीम इंडियाचा कॅप्टन ओमर दुल्हा आलेला आहे. तरुण धाव घेत दगड फेकला आहे. आणि हा उत्तुंग फटका. मैदानाच्या बाहेर. याचा सोबत इंडिया ७/०. पुढचा दगड आणि पुन्हा वेगात दुल्हाचा फटका. आणि काय गोलंदाजाच्या पोटात चेंडू मारला आहे दुल्हा ने. गोलंदाजच घायाळ झालेला आहे. खेळ थांबला आहे.

पाकिस्तानी हकीमुल्ला आलेले आहेत. काहीतरी पुटपुटत आहेत. रिप्ले पाहुयात. हे पहा, असा फटका होता, आणि असा गोलंदाज घायाळ झाला. अरे हे काय सर्व काश्मिरी खेळाडू गोलंदाज झाले आहेत. काय वाटत यावर तुला चंद्रा शास्त्री. ‘नाऊ , इट्स राँग. बट इन श्रीनगर इट्स हप्पान अल्वेझ’. मैदानावर दगडांचा खच जमा झाला आहे. ओमर दुल्हा पळून गेला आहे. पण तेंडूलकर तिथे दगड खात उभा आहे. काहीतरी पुटपुटत आहे. चला त्यालाच विचारूया. बोल मनमोहन, ‘माझी सर्व गोलंदाजांना विनंती आहे, की नियमांच्या चौकटीत राहून गोलंदाजी करावी. मी सगळ्यांचेच चेंडू नाही खेळू शकत एका वेळी’. (पोपट) पंचांनी काश्मिरी टीमला आठ धावांचे आव्हान दिले आहे. पाहुयात टीम काश्मीरमध्ये कोण ओपनिंग करीत आहेत. सुरवात तीच, पाकलानी आणि एक काश्मिरी. गोलंदाजी करीत आहेत झहीर.

पहिला चेंडू आणि पाकलानीचा उत्तुंग षटकार. तुझे काय मत आहे चंद्रा शास्त्री, ‘माईंड ब्लोईन, वाट ए शॉट. ही इझ रेली किंग ऑफ सिक्सर’. हो अगदी बरोबर. या उत्तुंग षटकार वरून पाहू शकतात पाकलानी खराखुरा छक्यांचा ‘बादशहा’ आहे. पहिल्याच चेंडूनंतर काश्मीर ६/०. दुसरा चेंडू आणि पाकलानीने ताकदीने फटकावला आणि एका बीएसएफच्या डोक्याला लागला आहे. अरे हे काय, बीएसएफचे जवान मैदानात चिडून घुसले आहेत. पण का? अरे मैदानातील टीम इंडिया कुठे आहे??? कुठे गेले चंद्रा रे ‘दे वेअर रान अवे फ्रॉम ग्राउंड बिफोर सिक्सर’.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत