सायकल

सायकल चालवणं तस नवीन नाही. बऱ्याच दिवसांपासून ठरवलेलं. परंतु अनियमितता होती. शेवटी गेल्या दोन दिवसांपासून सायकलपुराण सुरु झालं.

विश्वास बसणार नाही. २ वर्षे सायकलने प्रवास केलेला. ११-१२ वी सायकलने प्रवास. दररोज ३८ किमीचा प्रवास. गावापासून कॉलेज १९ किमी. ये जाण्यासाठी एकच बस. मग कंटाळून सायकलिंग. त्यावेळी मजा वाटायची. आठवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत चिंचवड – पुणे सायकलवारी. पण आता तीन किमीमध्ये अवसान गळते. बंधुराजांची सायकल वापरतो आहे. मध्यंतरी घरापासून कंपनी प्रयत्न केलेला. पण अपयश आलं. व्यायामाचही तेच.

ही सुरुवात आहे. सायकलने घर ते कंपनी ध्येय आहे. पाहुयात. व्यायाम, इंधनाची बचत. दुहेरी फायदा होईल. जे सहज शक्य आहे. ते करणे उत्तम. यश मिळेल. अशी अपेक्षा करूया. इच्छा पूर्ण करणे. त्यासाठी झटणे. ह्या गोष्टी अविस्मणीय. प्रयत्न अन सातत्य! यश मिळवण्याचे सोपे मार्ग आहेत. हाहा! फारच बोलतोय!!

बंधुराजांची सायकल कितपत साथ देईल हेही पाहावं लागेल. कारण माझ्या वजन त्याला झेपेल असे आता तरी वाटत नाही. हाहा! पण सुरवात म्हणून मात्र ठीक आहे. बाकी बोलूच!!

2 thoughts on “सायकल

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत