सी लिंक (शी लिंक)

मुंबईत कालच सी लिंक लोकांसाठी खुला केला गेला. त्याच्या नावावरून मला काही वाद घालायचा नाही. पण या वादातून दोन नवे पुढे आली ती म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अन्यही काही नवे या वेळी चर्चेत आली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बाबू गेनु वगैरे वगैरे. त्याला नाव स्व. राजीव गांधी सी लिंक असे ठेवण्यात आले. हे वाचून मला खरच काहीच नाही वाटले.

आणि कोणालाही काही वाटणार नाहीच. आता त्या सागरी मार्गाला गांधीचे नाव द्या किंवा अन्य कोणाचे द्या. मला काय त्याचा फायदा. मी दररोज लोकल ने प्रवास करतो. कधी कधी रिक्षा देखील. आता आजच पेट्रोल आणि डिज़लचे भाव वाढवले. म्हणजे पर्यायाने सगळेच भाव वाढणार. म्हणजे दूध वाला काय त्याच्या खिशातून वाढलेल्या पेट्रोलचे पैसे भरणार आहे?, की बस तो भुर्दंड सहन करणार आहे?. मला खरच हे समजत नाही की, की आपले नेते मोठा खर्च, करायला तयार असतात.

पण त्याना मूलभूत गरजा स्वस्तात द्यायला का तयार नसतात. जेवढा पैसे त्या सी लिंकवर खर्च झाले तेवढे खर्च न करता तोच पैसा पेट्रोलियम वर वापरला गेला असता, तर कदाचित पेट्रोलचे भाव एखादा रुपयाने कमी झाले असते. आणि वाद पण झाले नसते. बर, सोनियला असल्या उद्घटनाला यायला वेळ आहे पण, पेट्रोलचे भाव कसे कमी करावे यावर विचार करायला वेळ नाही. आणि काय म्हणाव त्या बारामातीच्या सूर्याला, त्याला बरोब्बर आठवाल की सी लिंकला कोणात नाव द्याव. पण त्याला हे का नाही आठवल की, पुण्याला 15 दिवसच पाणी पुराणार आहे. त्या नंतर पुण्याच्या लोकांचे पाण्याचे हाल होणार. आधीच वीज नाही आणि त्यात आता पाणी. मला सांगा जेवढा पैसे त्या सी लिंक ला खर्च झाले त्यात आपल्या पोलिसाना चांगली हत्यारे आणि बुलेतप्रूफ जॅकेट आली असती ना? पण हे बरोबर नाही आठवल मराठी राज्याच्या अशोकला. सम्राट अशोक कुठे आणि हा?. तुलना होऊ शकते? जाउ द्या. मला या राजकारणाचा आता खरच वीट आलय. तो सी किंवा शी, आता ठरावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत