2009

काय करावं???????

आज कंपनीत एक काम दिल होत. आजचीच डेडलाईन दिली होती. पण नाही झाल माझ्याकडून ते पूर्ण. सुरवातच बेकार झाली. मागील दोन आठवडे बेंचवर बसून होतो. आणि आता काम दिल आणि ते देखील वेळेत झाल नाही. त्यात ना तिचा विचार सारखा येतो. सोडा तो विषय नाही तरी आजकाल दुसर काही मी बोलत नाही म्हणाल. शनिवारी आमच्या कंपनीतील टीमची पार्टी होती. एकदम झक्कास झाली. आणि रविवारी मित्रांसोबत ‘अवतार’ चित्रपट बघून आलो. जर अनिमेशनची आवड असेल तर जरूर पहा. खुपच जबरदस्त अनिमेशन आहे त्यात. कथा म्हणाल तर मला फार काही खास अशी काही वाटली नाही. पण चित्रपटातील इफेक्ट्स छान आहेत. अरे, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. मागील शुक्रवारी माझे नव्या कंपनीतील मित्र आणि माझा ‘मराठी आणि मनसे’ यावरून वाद झाला. वादच म्हटला पाहिजे. त्यांना मी सांगितलेले मुद्दे पटले नाहीत. मला ते दोघे ‘सगळे भारतीय आहेत. कोणालाही कुठेही राहण्याचा आणि स्वत:ची भाषा जपण्याचा अधिकार आहे.’ ‘मराठी लोक काम करत नाहीत’. अस बरंच काही बोलत होते.Read More »काय करावं???????

मूर्खपणा

मी ना खूप मोठा मूर्ख आहे. सोमवारी माझ्या जुन्या कंपनीतील मैत्रिणीला फोन केला होता. माझ्या संगणकावर एक सोफ्टवेअर टाकायचे होते म्हणून. मी तसा प्रयत्न करून बघितला. पण काहीही केल्या ते होईच ना. आता तीने तीच्या संगणकावर केल होत म्हणून तीला फोन केला. तीने सांगितल्याप्रमाणे सुद्धा नाही झाल. शेवटी ती म्हणाली, तुला या शनिवारी माझ्या घरी तुझा संगणक घेऊन येशील का? म्हणजे मला नेमका कुठे अडचण येते आहे ते समजेल. खर तर या आधी कोणत्याही मैत्रिणीने अस मला तीच्या घरी बोलावलं नाही.Read More »मूर्खपणा

नवीन कंपनी

नवीन कंपनी जॉईन करून तीन दिवस झाले. यार या मोठ्या कंपन्याचे हत्तीसारखे असते. नुसताच आकार भला मोठा. आणि यांचा कामाचा वेग म्हणजे हत्तीच्या शेपटीसारखे असते. उंदीर एवढ काम. आणि ते संपवायला हजारात फौज. तीन दिवसापासून माझा एम्पोई आयडी नाही. म्हणून कामाला अजून सुरवात झालेली नाही. अस वाटत आहे की कुठे ‘पिकनिक’ करायला आलोय. ही कंपनी माझ्या जुन्या कंपनीच्या मनुष्यबळाच्या ७०० पटीने आणि आकाराने वीस हजार पटीने मोठी आहे. पण कामाच्या बाबतीत शंभर पटीने मागे आहे.  असो, पण अजूनही घडणाऱ्या घटनांवर विश्वास बसत नाही आहे. पण कंपनी खूपच छान आहे. दुख एवढंच आहे की जुन्या कंपनीतील माझी आवडती मैत्रीण आणि माझे जुने सहकारी माझ्या सोबत नाही  आहेत. मी कंपनी सोडताना त्यांनी सगळ्यांनी मिळून मला एक खूप छान सदरा आणि एक खूपच छान काचेची गणेश मूर्ती दिली. बघून त्यांना सोडून जाऊच नये अस वाटत होत. विशेषत माझ्या मैत्रिणीचा स्वभाव. आता इथे सुद्धा माझी सिनिअर एक छानशी मुलगी आहे. बहुतेक माझ्या भाग्यात या सगळ्या ललना आहेत. पण फ़क़्त आहेत. माझी कोणीच नाही. सोडा तो विषय. Read More »नवीन कंपनी

मन कल्लोळ

काय कराव. इथ एवढी काम पडली आहेत. आणि माझ मन कुठेही कधीही भटकते. काल परवापर्यंत तिच्या लहान बहिणीबद्दल कधी विचार येत नव्हता. आज तीच लग्नाबद्दल विचार ऐकले. वा! काही सेकंदासाठी मी स्वप्न पाहतो आहे की काय असं वाटत होत. कोणीही माझ्याशी थोड जरी गोड बोललं की मी पार पाघळून जातो अस मला वाटत आहे. ती जे काही सांगत होती. सगळ माझ्या मनातल. मग आज डोक आणखीनच जड झाल. बर हेच दोन दिवसापर्यंत आमच्या कंपनीत नवीन आलेल्या एका मुलीबद्दल वाटत होत. आणि आज तिच्या लहान बहिणीबद्दल. तीन महिने आधी तीच लग्न झाल म्हणून मी दुखी झालो होतो. जगण्यात काही अर्थच नाही अस वाटायला लागल होत.Read More »मन कल्लोळ

थंडी

रविवारी नगरहून पुण्याला येताना बसमध्ये फारच थंडी वाजत होती. एक तर रात्रीची वेळ आणि त्यात ती बस. आज देखील लोकलने घरी येताना थंडी वाजत होती. मध्यंतरी पावसामुळे हिवाळ्या ऐवजी पावसाला आहे की काय याची शंका यायला लागली होती. आता त्या कंपनीतील एसी तिन्ही ऋतू सारखेच वाटतात. मागील तीन वर्षांपासून हेच चाललं आहे. पण आज खूप दिवसांनी नैसर्गिक थंडी जाणवली. वडील नेहमी सांगतात थंडीत व्यायाम केलेला शरीराला अधिक पोषक असतो. आणि थंडीच्या वातावरणामुळे व्यायामसुद्धा अधिक होतो. गावी असताना थंडीत गल्लीत शेकोटी असायची. तिच्या बाजूला बसून शेकायला खूप मजा यायची. थंडीचा आणि उबेचा अनुभव एकाच वेळी यायचा. मजा यायची.

Read More »थंडी

लोकल

ती नेहमीच उशिरा यायची. रोज सकाळी कंपनीत आणि संध्याकाळी घरी यायला उशीर व्हायचा.  कधी खडकीत, तर कधी शिवाजी नगरमध्ये आणि कधीकधी पुणेस्टेशनच्या अलीकडेच अकारण थांबायची. माझा त्रागा व्हायचा. मागील तीन वर्षातले खूपच कमी दिवस असतील की तीची आणि माझी गाठभेट झाली नाही. आम्ही दोघे इतके अचानकपणे विलग होऊ, अस वाटल नव्हत. मोजून शेवटचे पंधरा दिवस उरले आहेत. मी मुंबई असताना आणि आता पुण्यात दोन्हीही ठिकाणी ती माझ्यासोबत होती. मुळात ही कल्पना करवत नाही आहे. खूपच वेगळ वेगळ वाटत आहे. मला आठवत माझा पहिल्या कंपनीची मुलाखतीसाठी आणि मुलाखत झाल्यावर देखील मी तीच्या बरोबर होतो. ती माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनली होती. ती सकाळी भेटावी म्हणून कधी दुध तर कधी नाश्ता सोडून घरातून धावपळ करावी लागायची. ती माझ्यासाठी इतकी महत्वाची बनली होती माझ्या ब्लॉग मधील सर्वाधिक नोंदी तीच्या वरच आहेत. आज घरी येताना याच विषयाने मन विषण्ण झाले होते.Read More »लोकल

आवडता आणि नावडता

एक आटपाट नगर होत. त्या नगरात एक कंपनी होती. त्या कंपनी मालकाचे दोन सेवक होते. एक होता आवडता आणि एक होता नावडता. आवडता सेवक कायम त्या मालकाच्या अवती भवती फिरे. कामाच्या वेळी ‘मी करतो’ अस म्हणून मालकाची मर्जी सांभाळी. त्याच्या उलट नावडता. मालकाच्या कामाच्या वेळी मालकालाच त्या नावडत्या सेवकाला बोलवावे लागे. तो कधीही ‘मी करतो’ अस म्हणत नसे. मालकाने ‘हे काम कर’ म्हटले की तो काही न बोलता निमुटपणे करी. आवडता सेवक कायम मालकाच्या कामाचा हेतू काय, ते कशासाठी करायचं? याची विचारणा करी. नावडता कारण न विचारता काम करी. न येणाऱ्या कामात नावडता लक्ष घालत नसे. मालकाला ‘मला जमणार नाही’ अस स्पष्ट सांगे. आवडता कायम काम नाही येत असेल तरी ‘मी करतो’ असे छातीठोकपणे मालकासमोर सांगे. आणि नाही जमले की, नावडत्याच्या मागे लागे. काम नावडत्याने केले तरी ‘मी केले’  अस मालकाला सांगे. त्यामुळे मालक त्या आवडत्या सेवकाची वाहवा करे.Read More »आवडता आणि नावडता

माझा राग

शनिवारी रात्री नऊ वीसच्या पुणे लोणावळा लोकलने आई वडिलांबरोबर घरी यायला निघालो. लोकलमध्ये एक बह्हादार ज्या बाजूने चढतात त्याच बाजूला बसलेला. आईला लोकलमध्ये चढताना त्याच्यामुळे अडचण झाली. ते बघून खरच माझ पित्त खवळल. खर तर आठची लोकल रद्द करण्यात आल्याने गर्दी झाली होती. त्यात ह्याने अडचण केली. त्या रागाच्या भरात त्याला मी दोन लाथा आणि गुद्दे लगावले. तो बह्हादार उठून उभा राहिला. त्यावेळी माझा राग आणखीन अनावर झाला होता. तो काही तरी बोलला पण मला काही न समजल्याने मी त्याला रागात ‘काय?’ अस विचारलं. त्याच तोंड बघण्यासारखे होते. गपचूप उभा होता. याआधी कधीच मी कोणाशी हातापायी केलेली नाही. पण यावेळी झाली.

Read More »माझा राग

काही तरी करावं

चला आज राजीनाम्याचे इमेल माझ्या बॉसला पाठवला. नवी कंपनी आणि आत्ताची कंपनी निवडताना थोडा गोंधळ झाला होता. पण ठीक आहे. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन कंपनीत रुजू होणार आहे. पण एक गोष्ट सारखी मनाला खटकत आहे. मागील तीन वर्षात, मी अनेक नवनवीन प्रकारच्या वेबसाईटवर काम केल आहे. अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. पण माझ्या एकूण अनुभवात एक देखील मराठी वेबसाईट नाही. मी नेहमीच स्वतःची आणि कामाची प्रगती कशी होईल याचा विचार केला आहे. आणि यात यशस्वी देखील झालो आहे. एक वर्षापूर्वी मला नेटवर मराठीत कस लिहायचं किंवा कस दाखवायचं ह्याची जाणून घ्यायची खूप इच्छा होती. आणि जवळपास चार महिन्यापासून मी माझा ब्लॉग मराठीतून लिहित आलो आहे. आपण जे बोलतो ते खर करून दाखवलं तरच आपल्या बोलण्याला काही तरी अर्थ राहतो.Read More »काही तरी करावं

आनंदी आनंद घडे

आज मला मागे आधी बोललो होतो ना, एका कंपनीत मी मुलाखत दिली होती. त्यांची ऑफर आली. मी जेवढी अपेक्षा केली होती त्याच्या दुप्पट मला त्यांनी ऑफर केली आहे. थोडा इथ जॉइनिंग डेटचा गोंधळ चालू आहे. पण उद्यापर्यंत सुटून जाईल तो प्रश्न. आज सकाळी वातावरण खूपच छान होते. म्हणजे काल रात्री पासूनच पुण्यात भुरभूर चालू होती. आत्ताही पाऊस चालू आहे. आज माझे वडील बरोबर होते म्हणून. नाही तर मी नेहमी अशा पावसात भिजत असतो. बाकी खूप दिवसांनंतर आनंद झाला आहे. काल अबूच्या थोबाडात मारलेली बघितल्यापासून माझा मुडच बदलला आहे. असो, काल अनेकांचे त्यावर लेख वाचले. आणि अनेकांची प्रतिक्रिया वाचल्या. संमिश्र आहेत मत. आज सकाळच वातावरण असलं मस्त होत ना. कंपनीतील माझा मित्र या वातावरणामुळे उशिरा उठला. काल दिवसभर उन नव्हते. आणि आज दुपार पासून पाऊस. एकूणच खूप छान वातावरण होते. आज ऑफर बघून म्हटलं  बॉसशी बोलून घ्यावं.Read More »आनंदी आनंद घडे