2010

सांगू??

सांगू? काय करू यार, जाम टेन्शन आले आहे. कस बोलू? आता नाश्त्याला येतेस का विचारू? की, कॉफीला बोलावू. कालपासून हाच विचार करतो आहे. यार, ना झोप येते ना चैन पडते आहे. फक्त मोजून तीन दिवस उरले आहेत. आता आज गेला की दोनच दिवस उरतील. झालेत सगळे सोपस्कार. आणि गोडी गोडीत त्या डीएमला देखील ‘जाऊ दे’ म्हणून मागे लागलो. यार जणू काय मी ह्याची गर्लफ्रेंड आहे, आणि ह्याने मला प्रपोज केल आहे. आणि मी नकार देतो आहे, अशी नाटके. यार माझा डीएम जाम नाटकी आहे. अजून तीन वर्ष थांब आणि तुझे शिक्षण कर. मग मी तुला पे रोलवर घेतो. अस म्हणत होता. Read More »सांगू??

एक मोती गळाला

ती आज का नाही आली? तिच्यासोबत एक एक दिवस म्हणजे जीवनातील सर्वात सुंदर क्षण. ती असते तर सर्वच अगदी छान. पण, अस का होत? ती आज नाही आली. सगळ किती छान चालू होत. चार दिवस नाही मोती. एक मोती गेला. बस! आता मोजून चार मोती. त्या ‘शुक्रवार’ नंतर नीट झोपच आलेली नाही. प्रत्येक क्षण, हा प्रत्येक मोती तिच्याविना व्यर्थ. मी मोबाईल घेतला आहे. तो नोकिया एक्स सिक्स. आज वाटले ती येईल. तिला आवडेल. मागील शनिवारी, नाताळच्या दिवशी घेतला. घ्यायचे अस काहीच ठरलं नव्हते. पण, तिला शब्द दिलेला. पाळायला हवा ना!Read More »एक मोती गळाला

जाणता भजा

जाणता भजा! दरबार सुरु होण्याची वेळ होते. ‘स्व’राज्यातील सर्व सरदार आणि महाराजांचे ‘आम आदमी’ जमा होतात. कुजबुज चालेली तेवढ्यात, घड्याळाचे दोलक जोरजोरात वाजायला सुरवात होते. सर्वजण हातातील घड्याळे छातीवर ठेवतात. दरबारात शांतता पसरते. दारावरील दोन सैनिक मोठमोठ्याने महाराज आल्याची घोषणा करतात. ‘प्रौढ प्रताप बंदर! बिल्डर, चोर, घोटाळे प्रतिपालक! शेतकरी कुलावतंस कृषीसानाधीश्वर, महाराजा अधिराज! शी शी शी भाव वाढपती सरद महाराज !!’ सर्वांच्या मान झुकतात. डाव्या हातात फाईलीचे बंडाले आणि डोळ्यावरील जाड भिंगाचा चष्मा, ते साडेपाच इंचची मूर्ती दरबारात दाखल होते. सिंहासनावर बसल्यावर सर्वजण माना वरती करून महाराजांकडे पाहू लागते. महाराज दरबाराकडे एक नजर टाकतात. आणि पहिली ‘टीक’ करा असा आदेश देतात. एक ‘आम आदमी’ समोर येतो. महाराजांना मुजरा करून उभा राहतो. महाराज त्याच्याकडे पाहून ‘बोल’. Read More »जाणता भजा

ती ती आणि ती

ती! काय बोलू. कालचा दिवस एकदम ‘सही’. अजूनही शरीरभर रोमांच उठत आहेत. बस काय बोलू कालच्या दिवसात काय घडल ते. फक्त ती आणि ती. दिवसभर कम्युनिकेटरवर गप्पा मारल्या. आणि ती माझ्या डेस्कवर सुद्धा आलेली. यार, काल रात्रभर नीट झोप लागली नाही. शेवटी पहाटे साडेतीन चारला टीव्ही सुरु केला. पण तिथेही जाम बोर झाल. मुळात आज घरात जाम बोर झालेलं. तिच्या आठवणीने व्याकूळ करून टाकलेलं. खरच, तिच्याशिवाय नाही सुचत काही. ती इतकी छान, गोड का आहे? आणि स्वभावाने इतकी प्रेमळ आणि सरळ. तिची खूपच आठवण येत आहे. मला नव्हते घरात करमत. म्हणून आज, मी ऑफिसला आलेलो आहे. Read More »ती ती आणि ती

भाषा

भाषा! माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात. Read More »भाषा

निर्णय

निर्णय! ‘बायको’चा फोन आलेला. म्हणाली ‘घटस्फोट नको करूयात’. बर, मी नको म्हणालो तर अप्सरापासून दूर जाणार. आणि ‘हो’ म्हणालो तर, या इथे ‘मेव्हणी’ सोबत राहावे लागणार. पण आता फरक फक्त एवढाच असेल की, आधी मी ‘भाड्याच्या’ घरात होतो. होतो कसला, म्हणजे ‘न घरका ना घाटका’ होतो. ना मेव्हणीचे घर माझे होते. आणि ना बायकोचे घर माझे होते. थोडक्यात, बायको आता ‘घरात’ घ्यायला तयार झाली आहे. पण रहायचे मेव्हणीच्या घरी. तस मी तिला बजावलं की, मला दोन स्थळांचा होकार आहे. बघुयात ‘हुंडा’ किती देते ती. Read More »निर्णय

बुट्टी

बुट्टी! काय चालल आहे यार! काय बोलाव अस झाल आहे. मोजून दहा दिवस हातात उरले आहेत. आणि त्यात हे माझे वागणे. शपथ, मी. काय ठरवतो आणि काय होते. आठवडाभर तिच्या आठवणीने इतके सतावले ना! आणि काल ऑफिसला बुट्टी झाली माझी. परवा रात्री झोपच येत नव्हती. बर कसाबसा वेळ घालवायची काम केली. पण तरीही, चारच्या सुमारास झोप आली. आणि सकाळी उठून पाहतो तर सकाळचे साडे दहा. मग पुन्हा जाग आली तर, झटपट आवरलं. वेळ पहिली तर दुपारचा एक. मग काय कंपनीला बुट्टी झाली.Read More »बुट्टी

नशीब

नशीब! ते म्हणतात ना ‘नशिबच गांडू तर काय करील पांडू’ तस झाल आहे अगदी! गेल्या दोन तीन महिन्यांपासून हे चालू आहे. मी जी गोष्ट करायला जातो ती होते, पण ताबडतोप किंवा एका झटक्यात होत नाही. म्हणजे ही अशी पहिलीच वेळ आहे. याआधी अस कधी घडल नव्हते. म्हणजे कंपन्या माझा इंटरव्यू घ्यायच्या आणि इंटरव्यू व्यवस्थित व्हायचे. परंतु नंतर पुन्हा त्यांचा फोन येत नसायचा. मग महिन्यानंतर, फोन!Read More »नशीब

हरकत नाय…

माझे ब्लॉग, लेख चोरी जात आहेत. पण ‘हरकत नाय’. खरच! काही हरकत नाही. ‘सीपी’ करण्यात काहीही हरकत नाही. स्वतःच्या नावाने माझ्या नोंदी प्रसिद्ध केल्यास तरी काही हरकत नाही. नो कॉपी राईट!!! काहीही करा. पण ‘मराठी’ वाढवा. माझे लेख चांगले वाटले असतील तर, त्यांना काहीतरी अर्थ आहे अस वाटत असेल तर बिलकुल ‘नावाचा’ विचार करू नका. त्यातून थोडेफार ‘अर्थार्जन’ होणार असेल किंवा तुमच्या ब्लॉगची हिटिंग वाढणार असेल तर उत्तमच. आता ती गोष्ट वेगळी की, माझा ‘ब्लॉग’ हा त्यासाठी कधीच नव्हता आणि नाही आहे. आणि कधीच तसा नसेल. Read More »हरकत नाय…

उदास

आज खूपच जास्त उदास वाटत आहे. म्हणजे तसा मी ‘बोरकर’च आहे. पण आज जरा जास्तच बेकार वाटत आहे. कालचा दिवस आणि आजचा. थोडक्यात दोन टोक. म्हणजे धो धो पावसात चिंब भिजावं. सगळ शरीर रोमांचून निघावं. आणि अचानक कडक तळपत्या उन्हात शरीर भाजून निघावं. काल ती! यार खूप आठवण येते आहे. कस होणार कंपनी सोडल्यावर माझ? मी आलेल्या ऑफर नाकारू का? ‘तिच्याशिवाय’ कस राहू? तिचे येणे, तिचे बोलणे, तिचे पाहणे काय नाही अस विचारा. पण ती आज नाही. सकाळपासून ते खोट हास्य आणून वैताग आला आहे. ती नसते तर सगळाच एकदम उदास झाल्याप्रमाणे वाटते. Read More »उदास