विचार का करायचा?

या वर्षाच्या सुरवातीपासूनच सगळंच बदललं आहे. कंपनीतील कामापासून मित्र मैत्रिणीपर्यंत. पण ठीक आहे. खूप मजा चालू आहे माझी. कामाच्या ठिकाणी आता एवढ कंटाळा येत नाही. आणि मला काम सुद्धा आवडणार दिल आहे. आई वडिलांनी माझ्या लग्नाचं फारच मनावर घेतलं आहे. आणि त्यांनी सुचवलेली स्थळसुद्धा म्हणजे मुली सुद्धा खूप छान आहे. उद्यापासून आमच्या कंपनीतर्फे ‘संभाषण आणि लेखन’ वर्ग सुरु होत आहे. एकूणच खूप छान चाललं आहे.

माझ्या जुन्या मैत्रिणीने मला जी टाल्कमध्ये अनब्लॉक केले आहे. पण आधी तीने ब्लॉक केले होते. त्यामुळे निदान ‘ती’ च रूप तरी कळल. नाही तर मी सगळ्यांनाच ‘आपल’ समजत बसलो होतो. म्हणजे आता सगळे आपल्यासारखे असतात. म्हणजे तसं मी त्या कंपनीत असताना ती माझ्याशी खूप छान वागायची. आता तीच ते वागण मला खूप आवडायचं. पण ते वागण त्या कंपनीतील कामासाठी होत. असो, आता अस कोणी वागलं तरी मला काही फरक पडणार नाही. दुसरा माझा मित्र. म्हणजे मागच्या दोन वर्षात घडलेल्या सगळ्या गोष्टी मी शेअर केल्या. पण तो सुद्धा तसाच निघाला. मराठी लोक आपले असतात. अस मी मानत आलो. पण सगळेच आपले नसतात, हे कळल.

आता कंपनीतीलच घ्या ना. एकूण पैकी ९०% मराठी आहे. पण तर मराठी इतरेतर लोकांशी ‘हिंदी’ मध्ये बोलण्यात त्यांना काहीच वाटत नाही. पण मराठी दुसर्या मराठीशी मराठीत बोलण्यापेक्षा इंग्लिशमध्ये बोलण्यात मोठेपणा वाटतो. आता सगळेच असे आहेत. काय करणार. चुकून कधी राज ठाकरे आमच्या कंपनीत आला तर तो डोक फोडून घेईल. म्हणेल, यांच्यासाठी उगाचच वेळ आणि श्रम वाया घातले. सुरवातीला मी त्यांच्याशी मराठीत बोललो, पण ते ‘मराठी’ माझ्या मराठी बोलण्याचा अर्थ मला ‘इंग्लिश’ येत नाही असा काढू लागले. त्यामुळे असल्या ‘मराठी’ लोकांशी फ़क़्त ‘इंग्लिश’ मधेच संवाद साधायचा अस आता मी ठरवलं आहे. आणि आता कंपनीतील जो माझ्याशी ‘मराठीत’ त्याच्याशीच मराठीत बोलायचे. नाही तर इंग्लिश. कारण हे असले मराठी नाही तरी भुईला भारच आहेत. यांना आपल मानून चूक करण्यात काय अर्थ वाटत नाही.

असो, पण एकूणच खूप छान चालू आहे. आणि आता राग वगैरे येत नाही मला. कारण सगळेच स्वार्थी असतात. प्रत्येकाला काही ना काही हवे असते म्हणून ते आपल्याशी गोड बोलतात. काम संपले की त्याच्या पुढच्या सेकंदाला ते आपल्याशी ओळख विसरतात. मग आपण का त्यांचा विचार का करायचा? पण ठीक आहे. मला या गोष्टींचा अनुभव नव्हता, तो आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत