लोकलमधील आसने

चकित झालात? अहो मी खर तेच बोलतो आहे. लोकलचा प्रवास म्हणाला की त्याबरोबर अनेक गोष्टी आल्याच. या आसनाचा शोध(साक्षात्कार), होण्यासाठी कोणत्याही तपाचा किंवा क्लास, किंवा कोणत्या बुवाची गरज नाही. आता हेच बघा, लोकलची वाट पाहत तुम्ही उभे रहता. कधी गाडीच्या दिशेने, तर कधी सिग्नल्च्या दिशेने बघता ही क्रिया अनेक वेळा होते. आत ही आसनाची पूर्व तयारी.

Continue reading “लोकलमधील आसने”

मला काय त्याचे ?

परवा रात्रि दहाच्या सुमारास कोरेगाव पार्कमध्ये एका अपघातात एक युवक ठार झाला. काल सकाळी मी सकाळी कंपनीत येत असताना ती कार बघितली. ती कारने त्या युवकाला उडवून रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्तानाकत, त्या स्तानाकाचे आणि गाडीचे  बरेचसे नुकसान केले. बघून अंगावर काटा उभा राहिला. कंपनीत या घटने बद्दल मी माझ्या सहकार्यांशी चर्चा केली. पण त्याना या विषयात रसच नव्हता.

Continue reading “मला काय त्याचे ?”

भन्नाट सरी

सकाळी चांगलेच उन पडले होते, पण जस जसा दिवस संपायला  लागला तस तसा अंधार आनाखिनच गडद व्हायला लागला. त्यात कामावरून निघायला मला उशीर झाला. कशी बशी एकदाची सात वाजताची लोकल मिळाली. पण दुर्दैव लोकल होती सातची आणि निघाली ७:३० ला. राग आणि निराशा दोघेही एकाच वेळी आल्यावर काय होत ते मला आज समजल. एक तर गेटवर जागा मिळाली, पण ती देखिल दुसर्या क्रमांकाची. खर तर मुंबईवरुन  आल्या पासून लोकलच्या गेटवर उभा रहायचे आणि ते देखिल पहिल्या क्रमांकाच्या जागेवर अशी (खोड) सवय लागलेल्या माणसाला, दुसर्या क्रमांकावर समाधान कसे होइल?

Continue reading “भन्नाट सरी”

इंश्योरेंस पॉलिसी

काही दिवसांपासून मला अनेक कंपन्यांचे फ़ोन येत आहेत. नाही, तस म्हणजे मला बऱ्याच आधी पासून कंपन्यांचे फ़ोन यायचे पण ते माझ्या नोकरी बद्दल असायचे. हे जे आजकाल फ़ोन येत आहे, ते इंश्योरेंस कम्पनीं कडून. प्रत्येक जन त्याची पॉलिसी किती छान आणि फायदेशीर आहे. याचे तो विश्लेषण करतो. यात तुमचा कसा आणि किती फायदा आहे याचे तो / ती साविस्तर वर्णन चालू असते. मला एक गोष्ट कळत नाही की यांना माझा मोबाइलचा क्रमांक कसा सापडतो हेच कळत नाही.  मध्यंतरी एका मुलीचा फ़ोन आला याचा इंश्योरेंस संदर्भात.

Continue reading “इंश्योरेंस पॉलिसी”

तीर् नयनाचे

आताचा रविवार, परत आयुष्यात येऊ नये हीच प्रार्थना. या रविवार माझ्यावर किती वार, तीर् सोडले गेले असतील याची कल्पना तुम्हाला यावरूनच येऊ शकते की माझे मागचे पोस्ट आणि हे यातले वेळेचे अंतर. नेमक काय आणि कस घडल हे कळायला मार्गच नाही. सकाळी सकाळी तुम्हाला कोणत्या तरी मैत्रिणीचा फोन येतो. तुम्ही तो फोन साखारझोप सोडून उचलता. पण फोनवर काहीच आवाज येत नाही. आणि तुम्ही मुर्ख सारखे हेलो हेलो करत बसता.

Continue reading “तीर् नयनाचे”

सी लिंक (शी लिंक)

मुंबईत कालच सी लिंक लोकांसाठी खुला केला गेला. त्याच्या नावावरून मला काही वाद घालायचा नाही. पण या वादातून दोन नवे पुढे आली ती म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अन्यही काही नवे या वेळी चर्चेत आली ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, बाबू गेनु वगैरे वगैरे. त्याला नाव स्व. राजीव गांधी सी लिंक असे ठेवण्यात आले. हे वाचून मला खरच काहीच नाही वाटले.

Continue reading “सी लिंक (शी लिंक)”