ब्लॉग्स

संकल्प स्वतःचे

किती अवघड! म्हणजे ‘संकल्प’ ही गोष्टच अशी आहे की, जी पाळणे जवळपास अशक्यप्राय आहे. शाळेत असतांना शिक्षकांच्या सांगण्यावरून मी अनेकदा अभ्यासाचे ‘वेळापत्रक’ बनवायचो. आणि ते पाळण्याचा संकल्प करायचो. पण चुकून एकदाही तो संकल्प पूर्णत्वास गेला नाही. इतरांचे पाहून वर्षाच्या सुरवातीला मी देखील नवीन गोष्टींचे ‘संकल्प’ सोडायचो. आणि सुरवात व्हायची. काही दिवसांनी ‘संकल्प’

गोष्ट एका फसलेल्या चोरीची

एका आटपाट नगरात एक ‘हेमंत’ नावाचा युवक रहात असतो. तो ज्या इमारतीत वास्तव्य करीत असतो. त्या इमारतीला लागुनच असलेले ‘साई’मंदिरातील पेटी फसलेल्या चोरीची ही गोष्ट. नेहमीप्रमाणे रोज त्या मंदिराच्या

संगीत

हे संगीत म्हणजे मनाचा आरसा. जसे पावसात भिजतांना मन उल्हासित होते, अगदी तसेच गाणी ऐकतांना सुद्धा. म्हणजे,

गोष्ट एका कमळाबाईची

काय सांगावं ती करुणकथा.  एका आटपाट राज्यात एक शिवाजीराव नावाचा युवक रहात होता. तरुण राजबिंडा आणि रुबाबदार.  कधीही न घाबरणारा. त्याचा ‘आवाज’ सर्वांनाच परिचित असा.  त्याचा विवाह एक नाजूक, कोमल अशा ‘कमळाबाई’शी झाला. कमळाबाई मुळातच सालस, आज्ञाधारी. आता रा.स्व. संघरावांची कन्या म्हटल्यावर काय बात. बाबा कधीही काही म्हणाले की कायमच ‘दक्ष’.

दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु झाला. अगदी ‘बाबरी’पासून ते ‘गोध्रा’पर्यंत दोघांचे विचार एक. नजर लागावी असा तो संसार. दोघांनी मिळून पुढे जाऊन ‘बाळ’ झाले. अगदी जोशींच्या ‘मनोहर’ सारखे. पुढे दुर्दैवाने ‘नारू’ रोगामुळे पाच वर्षातच दगावले. बाळाच्या

अतिरेकी आणि अतिरेकी

आपल्या देशात अनेक विचार मानणारे लोक आहेत. काहींना एखादी गोष्ट पटते. तर काहींना दुसरी एखादी गोष्ट पटते. उदाहरण द्यायचे झाले. तर आपल्या पंतप्रधानांचे. काहींना मोदी बरोबर वाटतात. तर काहींना चुकीचे. दुर्दैव एवढेच आहे की, दोन्ही बाजूच्या लोकांना आपलेच मत बरोबर आहे. आणि ते दुसऱ्यांनी पटवून घ्यायलाच हवे असा त्यांचा अट्टाहास. थोडक्यात अतिरेकी दोन्हीही बाजूला आहेत.

Continue reading “अतिरेकी आणि अतिरेकी”