ब्लॉग्स
गोष्ट एका कमळाबाईची
काय सांगावं ती करुणकथा. एका आटपाट राज्यात एक शिवाजीराव नावाचा युवक रहात होता. तरुण राजबिंडा आणि रुबाबदार. कधीही न घाबरणारा. त्याचा ‘आवाज’ सर्वांनाच परिचित असा. त्याचा विवाह एक नाजूक, कोमल अशा ‘कमळाबाई’शी झाला. कमळाबाई मुळातच सालस, आज्ञाधारी. आता रा.स्व. संघरावांची कन्या म्हटल्यावर काय बात. बाबा कधीही काही म्हणाले की कायमच ‘दक्ष’.
दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु झाला. अगदी ‘बाबरी’पासून ते ‘गोध्रा’पर्यंत दोघांचे विचार एक. नजर लागावी असा तो संसार. दोघांनी मिळून पुढे जाऊन ‘बाळ’ झाले. अगदी जोशींच्या ‘मनोहर’ सारखे. पुढे दुर्दैवाने ‘नारू’ रोगामुळे पाच वर्षातच दगावले. बाळाच्या
अतिरेकी आणि अतिरेकी
आपल्या देशात अनेक विचार मानणारे लोक आहेत. काहींना एखादी गोष्ट पटते. तर काहींना दुसरी एखादी गोष्ट पटते. उदाहरण द्यायचे झाले. तर आपल्या पंतप्रधानांचे. काहींना मोदी बरोबर वाटतात. तर काहींना चुकीचे. दुर्दैव एवढेच आहे की, दोन्ही बाजूच्या लोकांना आपलेच मत बरोबर आहे. आणि ते दुसऱ्यांनी पटवून घ्यायलाच हवे असा त्यांचा अट्टाहास. थोडक्यात अतिरेकी दोन्हीही बाजूला आहेत.