ग्रामगीता अध्याय पहिला ९

ग्रामगीता अध्याय पहिला ९

तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि ।
अजूनि नाही जीवाभावांत शिरली ।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली ।
आम्हांपाशी ॥९॥

– संत तुकडोजी महाराज

अर्थ – इतके त्यांचे कर्म व निष्काम आणि निर्मळ असते. हे भगवंता तुझी पूर्ण शक्ती आणि तुझे विश्व व्यापक विचार आमच्यात अजूनही शिरले नाहीत. म्हणूनच आम्ही अजूनही आज्ञान आहोत. आम्ही जर तुझे विचार आत्मसात केले की विश्वरूप सर्व एकच आहे तर आमच्याकडे अज्ञान आणि भेदभाव राहणारच नाही.

ग्रामगीता – अध्याय पहिला २१

सुर्य जैसा नभी उगवला ।
अंधकाराचा नाश झाला ।
तैसा तूं हृदयीं प्रकटला ।
जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला २१”

ग्रामगीता – अध्याय पहिला २०

यासीच पाहिजे सूर्यकिरण ।
अनेक मार्ग दिसती दूरून ।
अनुभवया आपुलें चिंतन ।
ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला २०”

ग्रामगीता – अध्याय पहिला १९

तूंची खरा निश्चयी अविनाशी ।
कधीकाळांही न ढळशी ।
सर्व गुणज्ञान तुझेपाशी ।
हवे ते ते लाभती ॥१९॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १९”

ग्रामगीता – अध्याय पहिला १८

तारकेवरि दृष्टि धरली ।
तीचि स्वयें क्षणांत उडाली ।
तैसी गति होईल आमुची भली ।
विशाल मार्गी ॥१८॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १८”

ग्रामगीता – अध्याय पहिला १७

उजेडाकरितां काजवे धरावे ।
भुललिया मार्गी परतों जावें ।
तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें ।
निर्भयपणे ? ॥१७॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १७”

ग्रामगीता – अध्याय पहिला १६

दुजा कोणा शरण जावें ।
तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ?
एकेकाचे चरण धरावे ।
तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १६”

ग्रामगीता – अध्याय पहिला १५

हें जेव्हां अनुभवा आलें ।
तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें ।
म्हणोनि तुझ्या नामी वेधलें ।
चित्त सर्वतोपरी ॥१५॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १५”

ग्रामगीता – अध्याय पहिला १४

कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १४”

ग्रामगीता – अध्याय पहिला १३

ग्रामगीता:

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥

– संत तुकडोजी महाराज

Continue reading “ग्रामगीता – अध्याय पहिला १३”