बाळासाहेब ठाकरे

काय बोलू! अगदी असह्य होतंय. अगदी ती, बाळासाहेब नसण्याची बातमी आल्यापासून ते आतापर्यंत सगळंच.. माहिती नाही का, पण त्या महान व्यक्तीच्या नसण्याच्या गोष्टीने अगदी असुरक्षित वाटत आहे. खर तर एक गोड बातमी तुम्हाला सांगणार होतो. पण हे अस घडलंय की..घराचाच आधारस्तंभ कोसळल्याप्रमाणे वेदना होत आहेत. त्या महामानवाबद्दल काय बोलावं, काय सांगाव.

Continue reading “बाळासाहेब ठाकरे”

का?

प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी तो ‘का?’ येतो. सकाळी उठून वर्तमानपत्र उघडतो. बातम्या वाचू लागताच तो डोकावू लागतो. आवरून देवळात जातो. देवासमोर नतमस्तक होतो. थोड्याच वेळात दर्शनावरून मनात गोंधळ होतो. देवाच्या दर्शनाचा उद्येशाने आलेलो. पण दर्शन घेतले त्या ‘दानपेटीचे’. देवळात देवासमोरच दानपेटी कशासाठी म्हणत तो येतो. या विचाराने मन खजील होते.

Continue reading “का?”