बौद्धिक दुष्काळ

बौद्धिक दुष्काळ हा इतर कोणत्याही दुष्काळापेक्षा अधिक भयावह आहे. ३७० कलमाची झिंग झिंगून सरकार इतके बेफाम झाले की महाराष्ट्रातील धरणाच्या खिडक्या उघडून मोकळे झाले. ज्याला आपण लोकशाहीचा एक आधारस्तंभ वगैरे म्हणतो. ते पत्रकारिता तर बोलायलाच नको!

मुळात धरणात किती पाणीसाठा आहे. किती पाऊस झाल्यावर धरणे भरतात. ही माहिती जलसंपदा विभागाला माहित नाही असे होऊ शकत नाही. तीन चार महिने दुष्काळाने महाराष्ट्र त्रस्त असतांना!

अगदी अनेक शहरात पाणीकपात सुरु असतांना धरण कोणताही विचार न करता सोडून देण्यात आली. कधी नव्हते ते घडले. राज्यातील पाचशेहुन अधिक गावे पुराने वेढली गेली! कोल्हापूर, सांगली अगदी पुणे देखील संपर्काच्या बाहेर गेली.

सोळा लोकांचे जीव गेले. मुक्या जनावरांचा तर आकडेवारीच नाही! टीव्हीवर आपले जलसंपदामंत्री राज्याचे काही सोयर सुतक नसल्याप्रमाणे ३७०च्या झिंगेत झिंगलेले. बातम्यांच्या वाहिन्यांना तर ३७०च्या नशेत होती!

इकडे दूध व्यवसाय असो, इंधनाचे व्यवस्थापन ठप्प झाले! तिकडे इंदापूरसारख्या तालुक्यात थेंबभर पाऊस नसतांना गावे पाण्याखाली गेली. पुणे शहरातील पूल पाण्याखाली गेल्याने दोन दिवस वाहतूक ठप्प झालेली.

बरं, दोष कुणाचा तर म्हणे पाऊसाचा! कुठला कडक गांजा ओढतात देव जाणे! पाऊस राजाप्रमाणे आला. पडू लागला! पण आमच्या झोळ्या फाटक्या! बरं याआधीच कोकणातील एक धरण फुटलेलं! सात गाव पाण्याखाली गेलेली. पंचवीसहुन अधिक जनांचे बळी गेलेले.

अजून पाच धरणांमधून पाणीगळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. तीन वर्षांपूर्वी महाड पुलाची दुर्घटना झाल्यावर सर्व धरणांचे स्थापत्य शास्त्र विभागाकडून चाचणी घेतलेली! त्यात राज्यातील सर्व धरणे धोकादायक आहेत असा अहवाल देखील राज्य सरकारला मिळालेला.

अजूनही आमच्या राज्य सरकारला किमान डागडुजी करावी याचीही जाणीव झालेली नाही! गेल्या पाच वर्षात एक नवे धरण उभे राहिले नाही! गेल्या पाच वर्षात देशातील एकमेव धरण जे उभे राहिले ते छोटेसे तेलंगणा राज्याने उभे केलेलं!

दर दोन वर्षांनी दुष्काळ पडतो. तो का पडतो? पाऊस पडला तर धरणाची क्षमता इतकी कमी कशी? जर पाणी सोडले तर पूरपरिस्थिती निर्माण कशी होते? आपत्ती व्यवस्थापन का नाही?

असे प्रश्न सरकारला निर्माण न होणे हे सर्व बौद्धिक दुष्काळाची लक्षणे आहेत! जर प्रत्येक गोष्ट पावसावर ढकलायची असेल तर सरकार काय फक्त कर गोळा करण्यासाठी आहे काय? एकूणच सावळा गोंधळ आहे!

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो.

Continue reading “मराठीची सक्ती”

पाणीप्रश्न आणि आम्ही

पाणीप्रश्न खरं तर दर डिसेंबर महिन्यापासून ते पुढील वर्षीच्या मे जून महिन्यापर्यंत चर्चिला जाणारा विषय. आपल्या घरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावरच आपण यावर बोलतो. टीका मग सल्ले यापुढे हा विषय कधीच जात नाही.

यापेक्षा महत्व आपण कुणीच द्यायला तयारही नाही. देशभरातही हेच! परंतु तरीही आपण स्वतःला फार हुशार वगैरे समजतो. आणि दरवर्षी तेच रटाळ चर्चितो. माझं जन्मगाव नगर जिल्ह्यातील. नगर हा बारा महिने दुष्काळी जिल्हा.

तिथं आजही दोन चार दिवसाआड तासभर पाणी आलं तरी लोक दिवाळी साजरी करतात. मुळात पाणीप्रश्नाशी आपापल्या परीने प्रत्येकाने मार्ग काढला आहे. कुणी साठवण क्षमता वाढवलेली तर कुणी वापरावर नियंत्रण. मुळात ह्या विषयाने इतके गांजले आहेत की त्यांनी तशी सवयच लागलेली आहे.

लोकसंख्या, पाण्याचा वापर हे विषय बोलून किती दिवस आपण पाण्याच्या स्रोतांना दुर्लक्ष करणार आहोत देव जाणे. पाऊस पडतो आणि वाहून जातो. धरणं आहेत म्हणून आठ एक महिने पाणी मिळते. पुढे कपात व राजकारण सुरु होते.

नीती आयोगच्या मते २०३० सालापर्यंत भारतातील ४०% जनतेला पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध राहणार नाही.

पाणी हवेतून निर्माण करण्याचे शोध काही शास्त्रज्ञानी लावला देखील. भारतही अशाप्रकारचे मशीन बनवले गेले आहेत. पण आजही या परिकल्पना वाटतात. पाणी वाचवणे हे उत्तम पर्याय आहेत. पण ते आम्हाला अन सरकारला कृतीत आणणे अशक्य झाले.

पाणीप्रश्न हा सोडवला जाऊ शकतो. प्रश्न इतकाच आहे की कृतीशिवाय सगळंच अशक्य आहे. एकट्या पुण्यात मनपाची ४०% इतके पाणीगळती होते. सगळी साधन असतांना केवळ निष्क्रियतेमुळे पाणीप्रश्न अस्तित्वात आहे. टीका करण्याचा विषय नाही. पण माहिती असूनही जर आपण हालचाल करायला तयार नाही आहोत.

मी स्वतःला माझ्यापरीने हा प्रश्नाशी लढतो आहे. तीन वर्षात एकदाही टँकर सोसायटीत आलेला नाही. मी माझी सोसायटी टँकरमुक्त ठेवली आहे. उद्देश इतकाच पाण्याचे महत्व सभासदांना लक्षात यावं. यापुढे देखील हाच पायंडा राहील!

त्यामुळे जोपर्यंत आपण स्वतःला तयार करत नाही तोपर्यंत हा प्रश्न सोडवला जाणार नाही. आपल्याकडून पाण्याचा शंभर टक्के योग्य वापर व्हायला हवा. नाहीतर जगात यावर चाललेले शोधांचा पर्याय वापरायला हवा. ह्याकडे दुर्लक्ष केवळ राज्यासाठी वा देशासाठीच नाही तर मनुष्य जातीसाठी धोकादायक आहे. सध्याला जिल्हा, राज्य अन देशपातळीवर वाद आहेत.

भविष्यात यातून युद्ध होणार नाही कशावरून? मग आपण आतापासूनच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे!

जय जय महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. उशिरा देतोय. त्याबद्दल क्षमस्व. आपला महाराष्ट्र खरच सुंदर आहे. अनेक गोष्टी अशा आहेत. ज्याने हा महाराष्ट्र अगदी मढला आहे. डोंगर, नद्या आहाहा. क्वचित एखाद्या भूप्रदेशाला असे लावण्य लाभले असेल. इथली लोक देखील तशीच. आणि स्वभावाने अगदी मधुर. कधीकधी याच गोष्टींमुळे महाराष्ट्र बाकीच्या लोकांच्या डोळ्यात खुपतोय असे वाटते. सतत काही न काही चालूच.

Continue reading “जय जय महाराष्ट्र माझा!”