आदर्श देशा

देशाने आदर्श घ्यावा अस ‘महान’ राज्य. राष्ट्रीय नेत्यांना लाजवेल असे या राज्याचे ‘आदर्शवादी’ नेते. मी तर म्हणतो, या आदर्शवत राज्याचा कारभार हाकणाऱ्या नेत्यांना, या सरकारला आणि विशेषतः सरकारी कर्मचारी, नाही चूक झाली. या सरकारी ‘जावई’बापूंना ‘भारतरत्न’ कमी पडेल म्हणून, ‘आदर्शरत्न’ पुरस्काराने सन्मानित करायला हवे. खर तर, या महान आणि अनमोल नेते, जावई बापूं मंडळींचा महीमा माझ्यासारख्या बापुड्या ‘आम आदमी’ काय वर्णावा?

Continue reading “आदर्श देशा”

आदर्श

प्रिय ‘सोनियाच्या अंगणातील’ फुलांनो, आयुष्यात एखादा तरी ‘आदर्श’ असावा. आता आमच्याही पिताश्रींनी ‘आदर्श घे’ असे अनेकदा सांगितले. पण आम्ही कधीही तसा घेतला नाही. पण आता सर्व सारासार आणि ‘अर्थ’पूर्ण विचार केला आहे. याआधी देशाचा विचार करतांना ‘अर्थ’ला हीन समजत होतो. कदाचित, तुम्हीही हे ‘पाप’ केले असेल. पण आता न्यूनगंड सोडा. उठा राष्ट्रवीर हो! सज्ज व्हा, आणि जमेल तितके, शक्य होईल तितका ‘शिष्टाचार’ करा. ‘यस वी क्यान’ अस कोणी तरी मुंबईत मध्यंतरी बोललेलं. हो! मी ‘राजा हिंदुस्तानी’चा आदर्श घ्यायचे ठरवले आहे. सतराशे कोटीचे ‘अर्थ’पूर्ण काम तमाम केले. पहा, याला म्हणतात ‘सो कलमाडी की आणि एक राजा की’. तसे या आदर्शवादी मायबाप सरकारने खरंच एक मोठा ‘आदर्श’ निर्माण केला आहे. सर्वच आदर्शमंत्री लोकांचे सरकार आहे.

Continue reading “आदर्श”