समाज माध्यमांची एकाधिकारशाही

खरं तर समाज माध्यमांविषयी काही बोलावं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, सातत्याने समाजमाध्यमांवर येणारी बंधने बोलायला भाग पाडतात.

साधारण, वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. माझा असाच एक मित्र! साधारण त्याच्याशी आभासी जगातुन झालेल्या संपर्काला आता एक तप झालं असेल. त्यावेळी म्हणजे साधारण २००८-०९ च्या सुमारास, तो अन मी नोंदी/ब्लॉगद्वारे व्यक्त व्हायचो. पुढे ब्लॉग लिहिण्यात फारसा रस राहिला नाही. अन संपर्क तुटला.

पुढे २०१६ मध्ये ट्विटर या समाजमाध्यमाद्वारे पुन्हा संपर्कात आलो. त्याहीवेळी त्याच्याकडून समाज माध्यमांवर येणारी बंधने विषयी माहिती मिळायची. परंतु, तसा अनुभव नसल्याने फारसं गांभीर्य वाटत नसायचे! साधारण दोन वर्षांपूर्वी त्याने कंटाळून पुन्हा ब्लॉग सुरु करायचे ठरवले. अन पुनश्च आमचा संपर्क कमी होत गेला.

त्याचा विषय घेण्यामागे तो त्यावेळी ज्या गोष्टी सांगायचं ते मी मध्यंतरी अनुभवल्या. राजकीय स्वार्थासाठी (खरं तर त्यामागे अर्थकारण दडलंय) एका प्रतिष्ठित समाज माध्यमाने बिनदिक्तपणे कोणतेही कारण न देता परस्पर निलंबित केले. पुढे वर्षभर मी दुसऱ्या खात्यावरून विचार मांडण्याचा प्रयत्न केला परंतु, तिथेही हजारदा संबंधित समाजमाध्यमाकडून अडचणी उभ्या टाकायच्या!

मग मी समाज माध्यम बदलून माझे विचार मांडायला सुरवात केले! तिथेही जाणीव व्हावी इतका त्या समाज माध्यमांचा अंकुश! खरं तर प्रत्येकजण आपले मत मांडण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करीत असतो. परंतु, जर तेच होणार नसेल तर तिथे जाण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो!

एका ठराविक पक्षविशेष पटेल तेच दाखवणे वा त्या खात्यावर अप्रत्यपणे बंधने लादणे खरं तर हा त्या खात्यांचा कमाईचे साधन असू शकेल. परंतु, त्याने एक गोष्ट अधिरेखित होते की समाज माध्यमे एकाधिकारशाही गाजवतात! त्यामुळे पुनश्च हरी ओम करण्याचे योजलेले आहे! पाहुयात हा उत्साह किती काळ टिकतो ते!

कायदा आणि आपण

खरं तर कायदा बद्दल काही बोलावं असं मनात नव्हतं. परंतु गेल्या काही काळापासून हे वातावरण या देशात आहे ते पाहता बोलणं भाग आहे. देशाला पुढे जायचं असेल तर तशी इच्छा आधी इथल्या लोकांमध्ये असणे जरुरी आहे. मी रोज घरापासून माझ्या कचेरीत येण्याच्या रस्त्यांमध्ये चौकाचौकात असलेल्या सिग्नल तोडणाऱ्यांचे प्रमाण पाहतो. घरी जातांना फुटपाथला लागून असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या दुचाकी आणि चारचाकी उभ्या गाड्या पाहतो. हातगाड्या आणि फेरीवाल्यांना पाहतो. पैशाशिवाय सरकारी काम होणार नाही अशी धारणा असलेल्या माझ्या सोसायटीतील सभासदांना पाहतो. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा पाहतो. कचरा टाकणाऱ्या आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पाहतो. मग मनात प्रश्न उभा राहतो की खरंच आपल्या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे?

Continue reading “कायदा आणि आपण”

ब्लॉग चा पुनः श्रीगणेशा!

पुनः श्रीगणेशा! बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत आहे. मधल्या काळात ट्विटरवर रमलेलो! पण ब्लॉग काही केल्या विसरता येईना!

यावेळी परंतु ठरवून आलेलो आहे. ज्ञान, विज्ञानतंत्रज्ञान आणि हो माझ्या ‘मी‘ ह्यावर तर नक्कीच बोलेन! तूर्तास फार काही पकवत नाही!

मी आणि माझा ब्लॉग

यार, काय बोलू? प्रतिक्रिया वाचून हसावं की रडावं अस होते आहे. माझा ब्लॉग माझी भलतीच इमेज बनवतोय. कधी ज्योतिषी, कधी इतिहासकार तर कधी कधी हा ‘हेमंत’ वेडा. खर तर ‘हेमंत’ ना ज्योतिषी ना इतिहासकार. ‘वेडा’ म्हटल्यावर माझी काही हरकत नाही. कारण, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या विषयात वेडा असतोच.

Continue reading “मी आणि माझा ब्लॉग”

पुन: हरी ब्लॉग

कशी सुरवात करू तेच समजत नाही आहे. अनेक दिवसांनी, पुन्हा: एकदा ब्लॉग सुरु करतो आहे. खर तर काय बोलावं, आणि कशी वाक्यरचना करावी यातच घोळ होतो आहे. खूप दिवसांनी बोलतोय म्हणून कदाचित अस घडत असेल. पण, मनात आनंद मात्र नक्की होतोय. मध्यंतरी मी, एक-दोन ब्लॉग सुरु करून पाहण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात मन नाही रमलं. आजकाल कामामुळे वेळ काढणे म्हणजे फारच अवघड बाब बनली आहे. पण, ब्लॉग सुरु करण्याची ‘इच्छा’ फार डोकावत होती. चला, आतापासून पुन्हा हरी ब्लॉग.

Continue reading “पुन: हरी ब्लॉग”

आभार महाराष्ट्र टाईम्सचे

आभार महाराष्ट्र टाईम्सचे! दिनांक १५ जानेवारी २०११ला ‘पुणे टाईम्स’ पुरवणीत माझी ‘पहिला दिवस’ ही नोंद छापल्याबद्दल मी, महाराष्ट्र टाईम्सचे आभार मानतो. खर तर, खूप आनंद होत आहे. यामुळे माझ्या संक्रांतीच्या दिवसाची सुरवात खरच खूप गोड झाली. यावर उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमस्व! ब्लॉग सुरु करतांना किंवा आताही अस कोणते वर्तमानपत्र माझ्या ब्लॉगची दाखल घेईल अस वाटलेलं नव्हते. आणि मध्यंतरीचे काही दिवस खरच खूप तणावाखाली गेलेले.

Continue reading “आभार महाराष्ट्र टाईम्सचे”

इंग्रजी भाषा

मी आज एक इंग्रजी भाषेत नवीन ब्लॉग बनवला आहे. ‘इज इट करेक्ट?‘ नावाचा. मुळात माझ आणि इंग्लिशच कधी जमलंच नाही. अगदी शाळेत असल्यापासून. तसं यावेळची बीसीएची परीक्षा सोडली. तर याआधी कधी ह्या इंग्लिश विषयात कधी गटांगळी देखील खाल्ली नाही. पण कधीच इंग्लिश विषय आवडला नाही. गणिताशी अस काही नव्हत. कारण, बर्यापैकी मार्क्स मिळून जायचे. पण आता इंग्लिश सुधारावे अस खूप वाटत आहे.

Continue reading “इंग्रजी भाषा”

हरकत नाय…

माझे ब्लॉग, लेख चोरी जात आहेत. पण ‘हरकत नाय’. खरच! काही हरकत नाही. ‘सीपी’ करण्यात काहीही हरकत नाही. स्वतःच्या नावाने माझ्या नोंदी प्रसिद्ध केल्यास तरी काही हरकत नाही. नो कॉपी राईट!!! काहीही करा. पण ‘मराठी’ वाढवा. माझे लेख चांगले वाटले असतील तर, त्यांना काहीतरी अर्थ आहे अस वाटत असेल तर बिलकुल ‘नावाचा’ विचार करू नका. त्यातून थोडेफार ‘अर्थार्जन’ होणार असेल किंवा तुमच्या ब्लॉगची हिटिंग वाढणार असेल तर उत्तमच. आता ती गोष्ट वेगळी की, माझा ‘ब्लॉग’ हा त्यासाठी कधीच नव्हता आणि नाही आहे. आणि कधीच तसा नसेल.

Continue reading “हरकत नाय…”

नोंद

नोंद! इतक्या उशिरा बोलतो आहे, त्याबद्दल क्षमा मागतो. माझा संगणक गेल्या काही दिवसांपासून ‘कोमात’ गेला असल्याने बोलणे शक्य नाही झाले. पण सर्वांच्या प्रतिक्रिया मी माझ्या मोबाईलवरून नियमित वाचत होतो. सर्वांच्या प्रतिक्रिया मला मान्य आहे. माझ्याकडून खूपच गोंधळ आणि रटाळपणा चालू आहे. जवळपास गेल्या दीड वर्षात नोंद बाळ ३६३ पावले, म्हणजे ही नोंद पकडून ३६४ पावले दुडूदुडू धावला. त्यातील साठी पेक्षा अधिक नोंदी तिच्यावरच आहेत. गेल्या चार महिन्यात मी ‘अप्सरा’ सोडून इतर विषयावर खूपच कमी बोललो, हे खर आहे. प्रत्येक नोंदीत तेच तेच आणि तोच तोच पणा आला, हे देखील खर आहे.

Continue reading “नोंद”