भाषा Tag

एक देश एक भाषा संकल्पना ही मुळातच भारतीय नाही. एका जर्मन तत्वज्ञ जोहान गोटलिब सतराव्या शतकात मांडली. व तिला अधिकृत स्वरूप मिळवून दिले. दुवा- https://babelzine.co.uk/wp-content/uploads/2018/11/No25-Article-Language-and-nationalism.pdf

भाषा /बोलण्याची पद्धत महत्त्वाचीच! थोड्या वेळापूर्वीच सोसायटीतील एका सभासदाच्या भावाचा फोन आलेला. प्रसंग अगदी सोपा! सोसायटीच्या भिंतींवर दोन दिवसापूर्वी परस्पर दोन तीन ठिकाणी स्वतःची सदनिका विकण्याची जाहिरातीचे पत्रक लावलेली. माझ्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकाने ती काढलेली. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा फोन आलेला. मी देहूरोड इथे राहतो. मला न विचारता आपण ती पत्रके कशाला काढलीत वगैरे वगैरे (खरं तर संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने मी विचारायला हवं होत!). मला खरं तर हसावं की रडावं तेच समजेना. साहेबांना 'सेक्रेटरीशी बोला' असं म्हणून मी फोन कट केला.

भाषा! माफ करा, पण पुन्हा एकदा या विषयावर बोलतो आहे. कदाचित मी फारच स्पष्ट किंवा फारच रागात बोलतो अस वाटेल. पण स्पष्ट बोललेलं कधीही चांगल. मी माझ्या नोंदींवर, ब्लॉगवर प्रत्येकाचा आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया या सर्वांचा आदर करीत आलो आहे. मला खरच कोणाचे मन दुखावायाची मनापासून इच्छा नाही. याआधी देखील मी हेच बोललेलो. आणि आताही मी बोलतो की, मला प्रत्येकाच्या प्रतिक्रिया मान्य असतात.

माझे ब्लॉग, लेख चोरी जात आहेत. पण 'हरकत नाय'. खरच! काही हरकत नाही. 'सीपी' करण्यात काहीही हरकत नाही. स्वतःच्या नावाने माझ्या नोंदी प्रसिद्ध केल्यास तरी काही हरकत नाही. नो कॉपी राईट!!! काहीही करा. पण 'मराठी' वाढवा. माझे लेख चांगले वाटले असतील तर, त्यांना काहीतरी अर्थ आहे अस वाटत असेल तर बिलकुल 'नावाचा' विचार करू नका. त्यातून थोडेफार 'अर्थार्जन' होणार असेल किंवा तुमच्या ब्लॉगची हिटिंग वाढणार असेल तर उत्तमच. आता ती गोष्ट वेगळी की, माझा 'ब्लॉग' हा त्यासाठी कधीच नव्हता आणि नाही आहे. आणि कधीच तसा नसेल.