वेबसाईट

वेबसाईट बद्दल काही नव्याने सांगावं अशी परिस्थिती नाही. तरीही ज्ञानाची उजळणी करण्याचा यत्न करतो. आपण सर्वजण परिस्थितीमुळे म्हणा वा युगाची अपरिहार्यता आभासी जगाला आपलेसे केले आहे. या डिजिटल/आभासी जगाची पहिली पायरी म्हणजे वेबसाईट/संकेतस्थळ असं आपण म्हणू शकतो.

खाद्यान्नाच्या विश्वात झोमॅटो/स्वीगी सारख्या हॉटेलातील अन्न घरपोच देणाऱ्या कंपन्यांनाचा आधार हा वेबसाईट हाच आहे. आस्थापनांचे मुख्य चेहरा म्हणून संकेतस्थळ (वेबसाईट) नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही व्यवसाय सुरु करत आहात, तर तुम्हाला संकेतस्थळाची गरज भासणारच!

अगदी काही शोध घ्यायचा आहे. तर गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्या सेवेसी अहोरात्र हजर आहे. काही वस्तू मागावयाच्या आहेत मग चाळा अमेझॉन,फ्लिपकार्ट सारखी संकेतस्थळे! मनोरंजनासाठी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, युट्युब सारखी संकेतस्थळे! जवळपास सर्वच क्षेत्रांची गरज संकेतस्थळे झाली आहेत!

मनपा असो वा केंद्रीय आस्थापने! त्यांच्याही सेवा अन तक्रारीसाठी संकेतस्थळे बनवलेली आहेत! थोडक्यात, संकेतस्थळे आपल्यासाठी नवीन नाहीत! इतके काय बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रे देखील आता संकेतस्थळावर अद्ययावत माहिती पुरवत असतात! इतकेच काय फेसबुक सारखी संकेतस्थळे जगाला एका धाग्यात गुंफत आहेत.

जगात अशी पावणे दोन संकेतस्थळे आहेत. मानवाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ती सहाय्यक ठरत आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांनीच जगाला दूर असूनही एकमेकांच्या संपर्कात ठेवले!

एकूणच आताच्या युगात संकेतस्थळे आपल्याला बहुपयोगी ठरत आहेत. आपण जर नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर त्याची माहिती जगाला मिळावी यासाठी नक्कीच संकेतस्थळ बनवणे नक्कीच फायदेशीर आहे. व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी खचितच ते हितवाह आहे!

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.

Continue reading “सोशल मीडिया आणि व्यवसाय”

ज्ञानाचे भांडार

आंतरजाल खरेखुरे भांडार आहे. हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे सुटू शकतात. त्यातील काही महाकाय भंडारी माहिती आपल्याला थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे!

Continue reading “ज्ञानाचे भांडार”

आई ग

किती सतावते यार ही आई! गेले किती वर्षांपासून हे चालू आहे. प्रत्येक रुपात ती त्रास देते. आतापर्यंत नऊ अवतार झाले तिचे. बाबा ‘बिल्लू’ गेटच्या बाहेर का नाही हाकलून देत? गेले एक आठवड्यापासून एक पिल्लुसा टास्क करतो आहे. तरीही त्या आईच्या बाळ ‘बग’मुळे तो लांबतच चालला आहे. प्रत्येक डिझायनर आणि डेव्हलपर आयुष्यातील सर्वात जास्त वेळ आईच्या मस्तीखोर ‘बग’ सुधारण्यात घालवतो. बाकीचे कसे, म्हणजे फायरफॉक्स उर्फ मोझीला किंवा बाळ क्रोम. हव तर सफारी, ऑपेरा घ्या. कस समजुदारपणे आणि नीटनेटके काम करतात.

Continue reading “आई ग”