सुधारणा

सुधारणा ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे उदाहरणार्थ गेले वीस वर्षांपूर्वी आपण ज्या पद्धतीने जीवन जगत होतो त्याच पद्धतीने आज जगत नाही. एक अविनाशी प्रक्रिया म्हणा हवं तर!

सुधारणा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगती करणे. आपण दिवसात अनेक कामे वारंवार करतो. त्यात बदल घडवून आपण आपला वेळ व श्रम वाचवू शकतो. हेच प्रगतीचे लक्षण आहे.

कालपेक्षा आज केलेले काम उत्तम होण्यासाठी सुधारणा ही आवश्यक असते. त्यासाठी निरीक्षण व योग्य बदल करणे अपेक्षित असते. ती जर घडली नाही तर आपण आपली प्रगती करू शकत नाही.

वा करण्याचे टाळले तर जगाच्या गराड्यात आपण हरवून जातो. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे दर सहा महिन्याला मोठे बदल घडतात. अनेक गोष्टींची सुधारित आवृत्ती तयार होते.

जो त्या स्वीकारून पुढे जातो त्याला यश हे हमखास मिळते. आपले प्रश्न व अडचणी ह्या सुधारण्याचा गुरुकिल्ली आहेत. प्रश्न वा अडचणी आल्याचं नाहीत तर जीवनात सुधारण्याच्या प्रक्रियेलाच खीळ बसेल.

त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने स्वतःतील बाबींवर स्वतःच निरीक्षण करून त्यात बदल करा. हेच बदल नवे अनुभव देतील. व यशाची कवाडे उघडतील!

अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपण नवीन गोष्टी करण्याचे टाळतो. अथवा त्यासाठी वेळ काढत नाही. परंतु त्यामुळे सुधारणांची प्रक्रिया खुंटते. पर्यायाने विकासाचा मार्गच थांबतो.

जगात जवळपास मोठ्या कंपन्या स्वतःचा असा एक विभाग (रिसर्च अँड डेव्हलपमेंट) बनवतो जो या आहे त्या पद्धतीत नावीन्य कसे आणता येईल. आपली वेळेची बचत कशी करता येईल. अन उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल याची काळजी घेतो.

त्यामुळे स्वतःला घडावा. स्वतःच्या गोष्टीत नावीन्य आणण्यासाठी प्रयत्नशील रहा. हाच प्रगतीचा व विकासाचा राजमार्ग आहे. त्यात काही चुका घडल्याचं तर त्याची चिंता करू नका. चुकातूनच माणूस शिकत असतो. उलट चुका न करणाऱ्याला देवच म्हणायला हवे.

सकारात्मक दृष्टीकोन अनेक सुधारण्याचा वाव देतो व स्वतःची प्रगती साधतो. त्यामुळे जगाची चिंता सोडा. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. अनेक बाबी सुधारता येतील. अन त्यातून अनेक प्रश्नांची उकल होईल.

शाळेत असतांना विनोबा भावेंचा एक धडा वाचलेला. त्याच शीर्षक होत ‘स्वरूप पहा विश्वरूपाची चिंता करू नका’. चला तर मग.

वेळापत्रक

वेळापत्रक तशी नवीन गोष्ट नाही. एकतर आपण आयुष्यात स्थिर स्थावर व्हायला वयाशी तीशी गाठतो. पुढे आर्थिक अन वेळेचे महत्व समजायला अधिक वर्षे गमावतो.

अर्ध्याहून अधिक आयुष्य वेळेचे महत्व समजण्यात जातात. मग उरलेल्या वेळेत घरगुती जबाबदाऱ्यात जाते. अनेक स्वप्न आपण पहात असतो. मग ते कधी पूर्ण करणार?

इथे वेळापत्रक किती महत्वाचे आहे, याचा अंदाज यावा. विचार करा आपलं सरासरी आयुष्य पन्नास-साठ जरी पकडलं तरी आपण निम्मं आयुष्य आताच गमावले आहे. निम्मं आयुष्य झोपण्यात व झोपेतून उठून आवरण्यात जाणार!

नोकरी/व्यवसाय करण्यासाठी जी वाहतूक करणार त्यात आयुष्याची काही वर्ष गमावणार. थोडक्यात सरासरी दर तासात आपण केवळ १० मिनिटे आर्थिक कमाईसाठी वापरतो.

अन कमाई कधी खर्च करणार? हाहा! यासाठी वेळापत्रक महत्वाचे आहे. सोपं गणित सांगतो. म्हणजे हे अनुभव घेऊन बोलत आहे. सकाळचा चार तास वेळ स्वतःसाठी काढू शकलो तर आपला दिवस सुरळीत जातो.

उठल्यानंतर पहिले चार तास

चार तास ह्यासाठी की, सकाळचा व्यायाम, दिनचर्या पूर्ण करण्यास साधारण तासभर जातो. पुढील तासभर ईमेल/सोशल मीडिया/वर्तमानपत्रसाठी देऊ शकतो. पुढील तासभर दिवसाचे नियोजन करण्यासाठी वा कालच्या दिवसाचा आढावा घेण्यासाठी देऊ शकतो.

पुढील एक तास चिंतन करण्यासाठी वा घरच्यांसाठी काढला तरी त्यांचाही दिवस आनंदायी जाऊ शकतो. खरं तर सकाळचे चार तासाचे नियोजन करण्याचे दैनंदिन धकाधकीत अतिशय अवघड आहे.

पण प्रयत्न केला तर अशक्य नक्कीच नाही. मलाही सुरवातीला अवघड गेलेले. सकाळी दिवसाचे नियोजन जर केले तर दिवसातील अनेक गोष्टीतील वेळ वाचतो. नाहीतर दिवस जाऊनही कामे अपूर्ण राहतात!

हे विसरलो! ते विसरलो! मग पुढे अनेक नसलेले प्रश्न उभे राहतात. मग ते सोडवण्यासाठी अधिक वेळ खर्च करावा लागतो.

देवाने सर्वांना २४ तास दिले आहेत. मग अंबानी अब्जधीश होतात. अन आपण रोजच्या अडचणीत आयुष्य खर्च करतो. असे का होते?

यासाठी वेळापत्रक बनवा. व पालन करा. अन पहा! स्वप्न पूर्ण होतील! वेळ वाया घालणे हे पैसे वाया घालवण्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.

चला तर मग वेळेला त्याचे महत्त्व देऊयात! जास्ती जगूयात. भविष्यावर फारसा विश्वास न ठेवता वर्तमानात जगूयात! प्रयत्न केलं तर काय अशक्य आहे? बाकी बोलूच!

प्रिय जिहादी यांस

प्रिय जिहादी यांस, वाकून सलाम! काय यार तुम्ही लोक. अस इंस्टालमेंट / हप्त्या हप्त्याने का? मी तर म्हणतो क्वाटर्ली किंवा हाफ इयरली कशाला? वेळ किती महत्वाची आहे. एकदाच काय ते करून टाका. हजार दहा हजार बॉम्बस्फोट देशात फोडून टाका. म्हणजे एकदाच काय ती तुमची ‘कयामत’ आमच्यावर येऊन जाईल. तुमचा खुदा देखील तुमची प्रमोशन ‘जन्नत’मध्ये करून टाकील. मग काय तुम्ही आणि तिथल्या छान छान पोरी!. नाहीतरी या देशावर पहिला हक्क तुम्हा ‘जिहादी’ आणि या आदर्शवादी सरकारचा आहे. तुम्ही कसे डायरेक्ट रिझल्ट. आमच्या सरकारचा सर्व्हर कायमच ‘डाऊन’ असतो.

Continue reading “प्रिय जिहादी यांस”